ऍडलेड : चेतेश्वर पुजाराच्या शतकामुळे भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी २५०/९ एवढा स्कोअर केला आहे. चेतेश्वर पुजारा १२३ रन करून आऊट झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मोहम्मद शमी नाबाद ६ रनवर खेळत आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात फारच निराशाजनक झाली. १०० रन होण्याआधीच भारताच्या ५ विकेट गेल्या होत्या. चेतेश्वर पुजाराशिवाय रोहित शर्मानं ३७, ऋषभ पंत आणि आर.अश्विननं प्रत्येकी २५-२५ रन केले.
या मॅचमध्ये भारताची सुरुवात खराब झाली होती. लंच ब्रेकपर्यंत भारताचा स्कोअर ५६/४ विकेट एवढा होता. पहिल्याच सत्रामध्ये भारतानं केएल राहुल(२ रन), मुरली विजय(११ रन), कर्णधार विराट कोहली (३ रन) आणि अजिंक्य रहाणे(१३ रन) असे ४ मोठे बॅट्समन गमावले होते.
हेजलवूडनं दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये केएल राहुलला आऊट केलं. ऑफ स्टम्प बाहेरच्या बॉलवर खेळताना खराब शॉट मारून राहुल आऊट झाला. स्लिपमधल्या एरॉन फिंचनं राहुलचा कॅच पकडला. पाचव्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कनं मुरली विजयला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पण विराट कोहलीच्या विकेटनं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं.
पॅट कमिन्सच्या बॉलिंगवर विराट कोहलीनं ड्राईव्ह मारायचा प्रयत्न केला पण उस्मान ख्वाजानं गलीमध्ये उडी मारून हवेतच कोहलीचा कॅच पकडला. हा कॅच पाहून फक्त प्रेक्षक आणि कॉमेंटेटर्सच नाही तर खुद्द विराट कोहलीही हैराण झाला.
No fairytale for Virat Kohli at Adelaide this time around as Usman Khawaja pulls off a blinder at gully!
1st Test LIVE on SONY SIX and SONY TEN 3 (also in HD).#ChhodnaMat #AUSvIND #SPNSports pic.twitter.com/EwarwZbwFF
— SPN- Sports (@SPNSportsIndia) December 6, 2018
पॅट कमिन्सनं आत्तापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये विराटला फक्त ४ बॉल टाकले आहेत. यातल्या २ बॉलवर त्यानं विराटला आऊट केलं आहे. या ४ बॉलमध्ये विराटला एकही रन काढता आली नाही.