VIDEO : विराट कोहलीने श्रीलंकेच्या खेळाडूला मारला चेंडू,आणि म्हटला...

  फिरोजशाह कोटला मैदानावर भारत वि. श्रीलंका कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात आज एक रोचक आणि विचित्र किस्सा घडला. 

Updated: Dec 4, 2017, 08:51 PM IST
VIDEO : विराट कोहलीने श्रीलंकेच्या खेळाडूला मारला चेंडू,आणि म्हटला...  title=
सदिराला चेंडू लागल्यावर विचारपूस करताना कोहली - VIDEO GRAB

नवी दिल्ली :  फिरोजशाह कोटला मैदानावर भारत वि. श्रीलंका कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात आज एक रोचक आणि विचित्र किस्सा घडला. 

श्रीलंकेची चौथी विकेट पडल्यानंतर क्रीजवर सदिरा समरविक्रमा आला. तेव्हा एक अशी घटना घडली की श्रीलंकेचा कर्णधार हैराण झाला.  कर्णधार विराट कोहलीने एक क्षेत्ररक्षण करताना सदिराला चेंडू मारला. हा चेंडू जोरात त्याला लागला, हे पाहून चंदीमल दुसरीकडे खूप घाबरला. ११५ व्या षटकात अश्विन गोलंदाजी करत असताना हा प्रकार घडला.  यावेळी श्रीलंकेचा स्कोअर ४ बाद ३०५ धावा होता. 

व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...

 

 

या षटकातील पहिल्या चेंडूवर कर्णधार चंदीमल अश्विनच्या चेंडूवर चौकार लगावण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा कोहलीने चेंडू आडवला. त्यानंतर  चेंडू विकेटकीपर साहाकडे फेकत असताना नॉन स्ट्राइकर एन्डवर असलेल्या सदिराला चेंडू लागला. 

सदिराला चेंडू इतक्या जोरात लागला की दुसरीकडे असलेला चंदीमल घाबरला. मग त्याने कोहलीकडे रागाने पाहिले. पण कोहलीने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि हे प्रकरण  मग हास्य विनोदात संपले.