नवी दिल्ली : भारत आणि बांग्लादेश यांच्या काल झालेल्या निडास ट्रॉफीच्या अंतीम सामन्यात एक वेगळचं चित्र दिसले. दिनेश कार्तिक या सामन्याचा हिरो ठरला पण आणखी एक चित्र दिसलं की ते अद्भूत होते. यात स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांचा समावेश आहे.
या संपूर्ण सामन्यात स्टेडिअममध्ये बसलेल्या श्रीलंकेच्या फॅन्सने भारताला पाठिंबा दिला. भारताच्या प्रत्येक विकेटवर आणि प्रत्येक फटक्यावर श्रीलंकन फॅन्स खूप चिअर करत होते.
बांग्लादेशला नाही तर भारताला पाठिंबा देण्याचे कारण या आधी बांग्लादेश आणि श्रीलंका सामन्यात झालेला राडा होता. यात बांग्लादेशने श्रीलंकेला पराभूत केले. तसेच या सामन्यात बांग्लादेशला खेळाडूंनी गैरवर्तणूक केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
तसेच शाकीबल हसन मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशनला आल्यावर त्याला प्रेक्षकांनी हुर्रर्रय केले होते. त्याला बोलू देत नव्हते.
Sri Lankan Fans Celebrating India's Victory, Team India Doing Victory Lap With Sri Lankan Flag. Cricket Has Won. Arrogance And Immaturity Of Bangladesh Team Has Lost. #DineshKarthik #INDvBAN #INDvsBAN #BANvsIND #NidahasTrophy pic.twitter.com/qBGnFfMfa8
— Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) March 18, 2018
यामुळेच फायनलमध्ये भारताने बांग्लादेशला पराभूत केल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडूही खूश झाले होते. टीम इंडियाला पाठिंबा दिल्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि सर्व संघाने खास अंदाजात श्रीलंकेला धन्यवाद म्हटले.
मॅच जिंकल्यानंतर रोहित शर्माने हातात श्रीलंकेचा झेंडा घेतला होता. तसेच असे करून त्यांनी संपूर्ण मैदानाला चक्कर मारली. तसेच फॅन्सला धन्यवाद म्हटले. टीम इंडियाच्या या भूमिकेमुळे कोट्यवधी चाहत्यांचे मन जिंकले. तसेच सोशल मीडियावरही त्यांची खूप प्रशंसा झाली.
टीम इंडियाचा सुपर फॅन सुधीरलाही श्रीलंकेच्या चाहत्यांनी उचलून घेतले. त्यानेही श्रीलंकेच्या झेंड्याला फडकवून त्यांचे धन्यवाद मानले.