IND vs NEP, Asia Cup : एक काळ होता जेव्हा एस श्रीसंतला डिवचायला क्रिकेटर्स घाबरत होते, त्याला कारण श्रीसंतचा राग, आता श्रीसंतची जागा घेणारा एक प्लेयर टीम इंडियामध्ये खेळतोय त्याचं नाव मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)... मैदानात मनासारखं झालं नाही की सिराजचा राग चौथ्या स्तरावर कधी पोहोचतो, कोणाला कळत देखील नाही. अशातच आता याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. सध्या सुरू असलेल्या इंडिया विरुद्ध नेपाळ सामन्यात सिराजने नेपाळी खेळाडूला थेट खुन्नस दिली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
सिराजच्या रागाचा सामना खुद्द टीम इंडियाच्या खेळाडूंना देखील करावा लागला आहे. विरोधी संघाचे खेळाडू आणि अंपायर याची प्रकरण सोडूनच द्या... भारत आणि नेपाळ यांचा सामना सुरू असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट मिळत नव्हती. नेपाळचे सलामीवीर कुशल भुर्तेल (Kushal Bhurtel) आणि आसिफ शेख मैदानात 10 व्या ओव्हरपर्यंत मैदानात पाय रोवून उभे होते. त्याचवेळी सामन्याच्या 6 व्या ओव्हरला सिराजला चांगला चोप बसला.
आणखी वाचा - आग लगे बस्ती में, कोहली अपनी मस्ती में, नेपाळी गाण्यावर विराटचा ब्रेक डान्स; पाहा Video
नेपाळच्या डावाच्या सहाव्या षटकात कुशलने सिराजविरुद्ध फोर आणि एक खणखणीत सिक्स खेचला. नेपाळचा खेळाडू आपल्याला सिक्स मारतोय म्हटल्यावर राग तर येणारच ना... सिराजने उभ्या उभ्या कुशलला खुन्नस दिली. सिराजची प्रतिक्रिया सोशल मीडियावर (Mohammed Siraj Viral Video) व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी सिराज आणि कुशलची शाब्दिक बाचाबाची झाली नाही. सिराज आपला पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा माघारी परतला.
What a shotttt!! #IndvsNep #siraj pic.twitter.com/nLFYIKEhMN
— STARBOY (@Dankstarboy) September 4, 2023
#INDvNEP >> #PAKvIND & Ashes.
Look at that aggression on Siraj's face. Tells hiw important is thiss game for India who want to prove a point to the world by beating Nepal.#AsiaCup2023 pic.twitter.com/pWhhYkvA2y— Arslan Haider (@Arslan_Haider0) September 4, 2023
दरम्यान, पहिल्या पाच ओव्हरमध्ये टीम इंडियाची फिल्डिंग खराब राहिली. सिराजने 133 किमी प्रतितास वेगाने टाकलेला चेंडू आसिफ शेखन आउटसाईड ऑफ चेंडू फटकावला होता. हा चेंडू थेट विराट कोहलीच्या हाती होता. पण त्यानेही हा झेल सोडला. त्यावेळी देखील सिराजने संताप व्यक्त केला होता. त्यानंतर सिराजच्या स्पेलचा रिदम गेल्याचं दिसून आलं होतं. मात्र, दुसऱ्या स्पेलवेळी सिराजने दमदार कमबॅक करत 2 विकेट घेतल्या.