फायनल मॅचमधल्या टॉसबाबत धक्कादायक खुलासा

अनिल कुंबळेने मंगळवारी भारतीय क्रिकेट टीमच्या हेड कोचपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसानंतर कुंबळेने राजीनामा का दिला आणि त्यासंबंधित आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला. कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात रविवारी भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान टॉस जिंकल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. कारण विराटने ऐन वेळेस वेगळा निर्णय घेतला. 

Updated: Jun 22, 2017, 01:41 PM IST
फायनल मॅचमधल्या टॉसबाबत धक्कादायक खुलासा title=

मुंबई : अनिल कुंबळेने मंगळवारी भारतीय क्रिकेट टीमच्या हेड कोचपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसानंतर कुंबळेने राजीनामा का दिला आणि त्यासंबंधित आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला. कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात रविवारी भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान टॉस जिंकल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. कारण विराटने ऐन वेळेस वेगळा निर्णय घेतला. 

भारत-पाकिस्तान चॅम्पियंस ट्रॉफीच्या फायनल मॅच आधी झालेल्या मीटिंगमध्ये निर्णय झाला होता की, जर भारताने टॉस जिंकला तर आधी बॅटींग घ्यावी. पण भारतासाठी आधी गोलंदाजी धोकादायक होती. पण तसंच घडलं. विराटने मात्र आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. अनुशासन नसल्याने कुंबळे गोलंदाजांवर देखील नाराज होता. बॉलर्सने फायनलमध्ये खराब प्रदर्शन केलं. धक्कादायक म्हणजे फायनल मॅच आधी मीटिंगमध्ये विराटने कुंबळेला शिवीगाळ देखील केली होती अशी चर्चा आहे.

कुंबळे आणि विराट यांच्यात ६ महिन्यापासून वाद सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरीजच्या तिसऱ्या टेस्टमध्ये हा वाद सुरु झाला. कुंबळेला या सामन्यात कुलदीप यादवला खेळवायचं होतं पण विराट याच्या विरोधात होता.