Virat Kohli ने Instagram वर मोडले सारे रेकॉर्ड्स

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे इन्स्टाग्रामचे 150 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत

Updated: Sep 3, 2021, 10:50 PM IST
Virat Kohli ने Instagram वर मोडले सारे रेकॉर्ड्स title=

मुंबई : टीम इंडियाचा  (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठी कामगिरी केली असली तरी तो नेहमीच सोशल मीडियावर हिट असतो. याचा पुरावा शुक्रवारी इन्स्टाग्रामवर पाहायला मिळाल. त्याने इन्स्टाग्रामवर  (Instagram) देखील नवा रेकॉर्ड केला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे इन्स्टाग्रामचे 150 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत, ही कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय ठरला आहे. क्रीडा विश्वात तो इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो अव्वल

337 दशलक्ष फॉलोअर्ससह फुटबॉलपटू रोनाल्डो (Cristiano Ronaldo) या यादीत पहिल्या स्थानी आहे. तर लिओनेल मेस्सी (Lionel Messi)  260 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर नेमार जूनियर (Neymar Jr) 160 दशलक्ष अनुयायांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 
आशियाई सेलिब्रिटींमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स सर्वाधिक आहेत. कोहली यापूर्वी इंस्टाग्रामवर 75 दशलक्ष फॉलोअर्सपर्यंत पोहोचणारा पहिला आशियाई बनला होता.

इन्स्टाग्राम व्यतिरिक्त, विराट कोहलीचे ट्विटर आणि फेसबुक सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त फॅन-फॉलोइंग आहे. आतापर्यंत त्याचे ट्विटरवर 43.4 दशलक्ष आणि फेसबुकवर 48 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

विराटने बॉलिवूड स्टार्सला टाकले मागे

अलीकडेच भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत Bollywood अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रणवीर सिंगला (Ranveer singh) मागे टाकले आहे.

विराटच्या एका पोस्टची किंमत 5 कोटी

डफ अँड फेल्प्सच्या सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन स्टडी 2020 नुसार, विराट कोहली 237.7 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूसह भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी ठरला आहे. भारतीय कर्णधार प्रत्येक पोस्टसाठी 5 कोटी रुपये घेतो. त्या तुलनेत रोनाल्डो प्रत्येक प्रायोजित इन्स्टाग्राम पोस्टसाठी 11.72 कोटी रुपये घेतो.