पंतप्रधान मोदींच्या 'विराट' विजयानंतर कोहलीच्या शुभेच्छा

विराट कोहलीने ट्विट करत मोदींनी दिल्या शुभेच्छा

Updated: May 24, 2019, 02:12 PM IST
पंतप्रधान मोदींच्या 'विराट' विजयानंतर कोहलीच्या शुभेच्छा title=

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी लाट पाहायला मिळाली. भाजपच्या धमाकेदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पीएम मोदींच्या या विजयानंतर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीने त्याच्या ट्विटरवर अकाऊंटवरुन पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत म्हटलं की, 'नरेंद्र मोदीजी यांना शुभेच्छा. आम्हाला विश्वास आहे की, तुमच्या व्हीजनमुळे भारत अधिक उंचीवर जाईल. जय हिंद.'

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला. पंतप्रधान मोदी सरकारवर भारतीय जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना आणखी एक संधी दिली आहे.

विराट कोहली सध्या भारतीय टीमसोबत वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. टीम इंडियाला शनिवारी आपला पहिला सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे.

देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आल्याने कोहलीने देखील पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर ३०० जागा मिळाल्या आहेत.