विराट धोनीवर भारी पडला, आक्रमक कर्णधारानं 'कॅप्टन कूल'ला हरवलं

जगभरामध्ये फूटबॉलचा फिव्हर जोरात आहे.

Updated: Jun 30, 2018, 05:41 PM IST
विराट धोनीवर भारी पडला, आक्रमक कर्णधारानं 'कॅप्टन कूल'ला हरवलं

मालाहाईड : जगभरामध्ये फूटबॉलचा फिव्हर जोरात आहे. रशियात सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये शनिवारपासून नॉक आऊट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताच्या क्रिकेट टीमचा आयर्लंडचा दौरा नुकताच संपला आहे. पण या दौऱ्यामध्येही भारतीय टीमवर फूटबॉल फिव्हर चढला होता. आयर्लंडमध्ये दुसऱ्या टी-२० आधी भारतीय खेळाडू फूटबॉल खेळताना दिसले. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि धोनीच्या टीममध्ये फूटबॉलची मॅच झाली. बीसीसीआयनं ट्विटरवर या मॅचचा व्हिडिओ शेअर केला आहे. दिनेश कार्तिकनं या मॅचची कॉमेंट्री केली. या मॅचमध्ये विराटची टीम धोनीवर भारी पडली. विराटच्या टीमचा ४-२नं विजय झाला.

दुसऱ्या टी-२० मॅचआधी भारतीय टीम हॉटेलमध्ये जेऊन सरावासाठी मैदानात पोहोचली. यानंतर दोन टीममध्ये फूटबॉलची मॅच झाली. भारतीय टीमला धोनी आणि कोहलीच्या टीममध्ये विभागण्यात आलं.