विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव, या खेळाडूंची स्पेशल ट्विट

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली त्याचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे.

Updated: Nov 5, 2018, 05:38 PM IST
विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव, या खेळाडूंची स्पेशल ट्विट title=

मुंबई : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली त्याचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिद्वारमध्ये विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत आहे. वाढदिवसानिमित्त विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयनं ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर अनेक आजी-माजी खेळाडूंनी विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सध्या टी-२० सीरिज सुरु आहे, पण या सीरिजसाठी विराटला आराम देण्यात आला आहे.

आगामी वर्षांमध्ये तुला यश आणि सुख मिळो, हीच शुभेच्छा, असं ट्विट सचिन तेंडुलकरनं केलं.

Sachin on Virat b'day

याचा जन्म झाल्यामुळे देवाचे आभार, असं ट्विट अनुष्का शर्मानं केलं.

Anushka on virat B'day

मॅच जिंकवून देणाऱ्या खेळी करणारा भारतीय टीमचा कर्णधार रनमशीन विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा, असा संदेश असलेला एक व्हिडिओ बीसीसीआयनं शेअर केला आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मणनंही ट्विटरवरून विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

VVS Laxman on Virat B'day

वीरेंद्र सेहवागनं त्याच्या खास अंदाजात विराटला शुभेच्छा दिल्या. या 'धनतेरस' निमित्त शुभेच्छा... पुढचं एक वर्ष तुझ्यासाठी 'रनतेरस' असुदे, असं ट्विट सेहवागनं केलं.

Virendra Sehwag on Virat b'day

हातातल्या जादूच्या कांडीनं आम्हाला रोमांचित करणारा. एका अशी व्यक्ती ज्यानं सातत्य काय असतं ते सांगितलं. त्याला चांगलं करण्याची भूक आहे. पुढचा कालावधी तुझ्यासाठी सर्वश्रेष्ठ असेल.. जन्मदिवसाच्या शुभेच्छा.. असं ट्विट मोहम्मद कैफनं केलं. क्रिकेट सम्राट... वाढदिवसाच्या शुभेच्छा विराट... असं सुरेश रैना म्हणाला.

Kaif and Raina on Virat kohli B'day