मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या पत्नीसोबत असलेलं एक खास नातं पुन्हा एकदा जाहीर केलं आहे. अनुष्का शर्माच्या प्रति असलेलं त्याचं प्रेम त्याने व्यक्त केलं आहे. कोहलीने फ्रेंडशिप डेला अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीने ट्विटरवर अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करुन तिला फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy friendships day pic.twitter.com/tou5CwLgfA
— Virat Kohli (@imVkohli) August 5, 2018
सिलेब्रिटी कपल एकमेकांना आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात. ते कधीच आपल्या भावना बोलून दाखवण्यात मागे नसतात. सोशल मीडियावर दोघांच्या मध्ये असलेली केमिस्ट्री नेहमी दिसते. कोहलीने बर्मिंगममध्ये शानदार शतक ठोकत त्याच्या वेडिंग रिंगला किस केलं होतं. विराटने इंग्लंडच्या धरतीवर हे पहिलं टेस्ट शतक ठोकलं आहे. स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काने देखील त्यांचा उत्साह वाढवला होता.