विराटने यांच्यावर फोडलं पराभवाचं खापर

३ सामन्याच्या टेस्ट मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत करत सिरीज ही जिंकली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 18, 2018, 10:42 AM IST
विराटने यांच्यावर फोडलं पराभवाचं खापर title=

सेंचुरियन : ३ सामन्याच्या टेस्ट मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत करत सिरीज ही जिंकली.

पराभवाचं खापर कोणावर?

सामना संपल्यानंतर विराट कोहलीने पत्रकार परिषदेमध्ये पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं. दुसऱ्या सामन्यामध्ये १३५ रनने भारताचा पराभव झाला. कोहलीने म्हटलं की, टीम अपेक्षांवर खरी नाही उतरली. 

विकेटने हैराण केलं

कोहलीने म्हटलं की, 'आम्हाला वाटलं होतं की, विकेट खूप सपाट आहे. ही खूप हैराण करणारी गोष्ट होती की, मी माझ्या सहकाऱ्यांना देखील सांगितलं होतं की, टॉसच्या आधी विकेट जशी पाहिली होती पण विकेट त्यापेक्षा खूप वेगळी होती.'

गोलंदाजांवर समाधानी

कोहलीने स्वीकार केलं की, टीम सुरुवातीला मिळालेल्या यशाचा फायदा घेण्यात अपयशी ठरली. 'पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचे विकेट घेतल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा घ्यायला हवा होता. कोहलीने पराभूत स्वीकारला. त्याने म्हटलं की, 'आम्ही फलंदाजीमध्ये अपयशी ठरलो.' कोहली गोलंदाजांच्या कामगिरीवर समाधानी दिसला. फलंदाजांची कामगिरी अजून चांगली हवी होती. गोलंदाजांनी आपलं काम केलं पण फलंदाजांनी निराश केलं.