विराट कोहली पांढरे शूज घालून का खेळतो? स्वतःच उघड केले रहस्य

Virat Kohli White Shoes: विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 19, 2023, 03:26 PM IST
विराट कोहली पांढरे शूज घालून का खेळतो? स्वतःच उघड केले रहस्य title=

Virat Kohli White Shoes: विराट कोहली महान फलंदाजांपैकी एक आहे. यावेळी उपांत्य फेरीत विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा शतकाचा विक्रम मोडला आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात विराट कोहलीच्या बॅटवर साऱ्यांची नजर असेल. या सामन्यात तो मोठी खेळी करेल असा विश्वास सर्वांना आहे. विश्वचषकात कोहलीच्या बॅटने काम केल्यास भारताच्या विजयाची शक्यता अनेक पटींनी वाढेल. दरम्यान विराट कोहलीचा काही गोष्टींवर प्रचंड विश्वास आहे. या विश्वासामुळे त्याच्या बाबतीतही चांगल घडत असत. यामागचं रहस्यही त्यानेच उघड केले आहे.

विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात. याचा खुलासा खुद्द विराटने केला आहे. पांढरे शूज घालूनच मैदानात उतरायला का आवडते? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर त्याने उत्तर दिले आहे.

पांढरे शूज घालण्याचे रहस्य 

कोहली देवासह काही अंधश्रद्धांवरही विश्वास ठेवतो. जगप्रसिद्ध फुटबॉल मॅनेजर पॅप गार्डिओला यांच्याशी झालेल्या संवादात त्यांने हा खुलासा केला. विराट म्हणतो मला पांढरे शूज घालून खेळायला आवडते. पांढरे शूज माझ्यासाठी लकी आहेत. जेव्हा तुम्ही हे शूज घालून मैदानात प्रवेश करता तेव्हा तुमच्यात एक वेगळी ऊर्जा असते आणि तुमच्या वेळेत जगता, असे कोहली सांगतो. यामुळेच तो जेव्हा-जेव्हा खडतर स्पर्धेसाठी मैदानात उतरतो, त्यावेळी पांढरे शूज त्याच्या पायात असतात. 

गार्डिओलाही विचारला शूजबद्दल प्रश्न 

यावेळी कोहलीने गार्डिओलादेखील त्याच्या खेळण्याच्या दिवसांत शूज बदलण्याबाबतही विचारले. यावर त्याने सांगितले की, जेव्हा मी फुटबॉल खेळलो होतो. तेव्हा शूज काळ्या रंगाचे होते. काळ्या रंगाचे शूज शोधणे कधीकधी कठीण असते, असे तो म्हणाला. 

एकदा मी लाल शूज घालून मैदानात आलो मात्र माझे मॅनेजर जॉन क्रुफ यांनी शूज पाहून लगेचच काळे शूज घालून येण्यास सांगितले. याचे कारण विचारले असता काळे शूज अधिक योग्य असल्याचे ते म्हणाले. तेव्हापासून आम्ही जेव्हा कधी खेळायचो. फक्त काळ्या रंगाचे शूज घालायचो, असे गार्डिओलाने कोहलीला सांगितले. 

सर्वांच्या नजरा विराटच्या बॅटकडे 

शुभमन गिल, रोहित शर्मा आणि श्रेयश अय्यर अशा 3 महत्वाच्या विकेट्स गेल्यानंतर सर्वांच्या नजरा आता विराटच्या बॅटकडे आहेत. उपांत्य फेरीत शतक झळकावणाऱ्या विराटकडून विश्वचषकातही शतक झळकावण्याची अपेक्षा आहे. या सामन्यात कोहलीची बॅट निकामी झाली तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढतील. भारताचा सामना जिंकण्याची शक्यता वाढू शकते.