Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

IND vs NZ, 2nd ODI :  हैदराबादमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही. 

Updated: Jan 21, 2023, 09:49 AM IST
Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का? title=
virat kohli record team india 25000 international runs india vs new zealand 2nd ODI live streaming time marathi news

Virat Kohli Record : पहिल्या विजयानंतर न्यूझीलंडवर मात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. आज रायपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे. आज दुपारी (21 जानेवारी 2023) 1.30 वाजता थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. आजचा दिवस भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठीही खास आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची बॅट तळपली तर एक मोठा विक्रम तो आपल्या नावावर करू शकतो. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू करु शकला नाहीय. 

रेकॉर्ड करण्यासाठी विराट सज्ज

आज विराट कोहलीला शतक ठोकण्यासोबत 111 धावा करणे गरजेच आहे. कारण आजच्या मॅचमध्ये विराटने 111 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरेल. हा रेकॉर्ड माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. पण सध्या खेळत असलेल्या कुठल्याही खेळाडूने एवढी मोठी धावसंख्या केलेली नाही. जर आज विराटची बॅटने कमाल दाखविल्यास हा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24,889 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 34357 धावसंख्या केली आहे. एक नजर टाकूयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंवर...(virat kohli record team india 25000 international runs india vs new zealand 2nd ODI live streaming time marathi news)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू 

1. सचिन तेंडुलकर (भारत) - 34357 धावा

2. कुमार संगकारा (श्रीलंका) - 28016 धावा

3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 27483 धावा

4. महेला जयवर्धने (श्रीलंका)- 25957 धावा

5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 25534 धावा 

6. विराट कोहली (भारत) - 24889 धावा

आता एक नजर टाकूयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कुठल्या खेळाडूने शतकं ठोकले आहे ते...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं

1. सचिन तेंडुलकर (भारत) - 100 शतकं

2. विराट कोहली (भारत) - 74 शतकं

3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 71 शतकं

4. कुमार संगकारा (श्रीलंका) - 63 शतकं

5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 62 शतकं

6. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) - 55 शतकं