LIVE SCORE विराटच्या शतकानंतर भारताचं कमबॅक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे.

Updated: Jan 15, 2018, 03:53 PM IST
LIVE SCORE विराटच्या शतकानंतर भारताचं कमबॅक title=

सेन्चुरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे. भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधलं त्याचं २१वं शतक झळकवलं. तिसऱ्या दिवसाचा लंच झाला तेव्हा भारताचा स्कोअर २८७/८ झाला आहे. विराट कोहली १९३ बॉल्समध्ये नाबाद १४१ रन्सवर खेळत आहे. तर इशांत शर्मा शून्य रनवर नाबाद आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची अवस्था १८३/५ अशी होती. विराट कोहली ८५ रन्सवर तर हार्दिक पांड्या ११ रन्सवर खेळत होता. पण हार्दिक पांड्या १५ रन्स करून आऊट झाला. पांड्या आऊट झाल्यावर आर. अश्विननं विराटला चांगली साथ दिली. अश्विननं ५४ बॉल्समध्ये ३८ रन्स केल्या. भारत अजूनही ४८ रन्सनी पिछाडीवर आहे. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा