विराट कोहलीचा नवा लूक पाहिलात का?

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली दुसरी टेस्ट १८ डिसेंबरला संपली. 

Updated: Dec 23, 2018, 06:33 PM IST
विराट कोहलीचा नवा लूक पाहिलात का? title=

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली दुसरी टेस्ट १८ डिसेंबरला संपली. यानंतर आता २६ डिसेंबरपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही मधली सुट्टी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली चांगलाच एन्जॉय करताना दिसत आहे. विराट कोहलीनं त्याची पत्नी अनुष्का शर्माचा झिरो हा चित्रपट पाहिला आहे. याचबरोबर विराटनं त्याचा लूकही बदलला आहे. विराटनं त्याच्या या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराटच्या या लूकला त्याच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला होता. तर दुसरी टेस्ट विराटच्या टीमला १४६ रननी गमवावी लागली होती. त्यामुळे ही सीरिज आता १-१नं बरोबरीमध्ये आहे. २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या टेस्टमध्ये जिंकून सीरिजमध्ये अजेय राहण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरतील.

पर्थ टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला असला तरी कर्णधार विराट कोहलीनं पहिल्या इनिंगमध्ये शानदार शतक झळकवलं होतं. विराटनं २५७ बॉलमध्ये १२३ रनची खेळी केली. यामध्ये १३ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे २५वं शतक होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र विराटला मोठी खेळी करता आली नाही. तर पहिल्या टेस्ट मॅचमध्येही विराट कोहलीला स्वस्तात आऊट करण्यात ऑस्ट्रेलियाच्या बॉलरना यश आलं होतं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x