सेहवाग आणि शोएब पुन्हा आमने-सामने पण बर्फाच्या मैदानावर

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहे.

Updated: Nov 23, 2017, 02:21 PM IST
सेहवाग आणि शोएब पुन्हा आमने-सामने पण बर्फाच्या मैदानावर title=

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहे.

आईस क्रिकेटमध्ये हे दोघे एकमेकांसमोर येणार आहेत. सेहवाग आणि शोएबचा स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरित्झ येथील बर्फाच्या तलावाजवळ एल्प्स पर्वतासमोर ही लढाई होणार आहे.  सेहवागने हा सामना खेळण्यासाठी फक्त २ मिनिटात हो म्हटलं. तर कैफने यासाठी ५ मिनिटे घेतली.

कधी रंगणार सामना

१९८८ मध्ये सेंट मॉरित्झमध्ये सामना झाला होता. पण पहिल्यांदाच या स्पर्धेत महान खेळाडूंमध्ये स्पर्धा रंगणार आहे. पुढील वर्षी ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी टी-२० सामना रंगणार आहे.

या खेळाडुंचा समावेश

वीरेंद्र सेहवाग, शोएब, मोहम्मद कैफ, महेला जयवर्धने, लसिथ मलिंगा, मायकेल हसी, ग्रॅमी स्मिथ, जॅक कॅलिस, डॅनियल व्हेटोरी, नॅथन मॅक्युलम, ग्रँट इलियट, मोंटी पनेसर आणि ओवेस शाह देखील या सामन्यात खेळणार आहेत.