दक्षिण आफ्रिका : विराट कोहलीचा क्रिकेट मैदानावरील दमदार परफॉर्मंस त्याला फायद्याचा ठरत आहे.
अनेक विक्रम मोडून तो नव्याने काही विक्रम रचत आहे. मात्र विराटच्या स्वभावामुळे त्याचे काही निर्णय आणि वागणूक नेहमीच चचेचा विषय बनला आहे. विराटबाबत माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
विराटच्या समोर उभं राहून कोणीच काही त्याच्या चूका दाखवत नाही. भविष्यात मैदानात विराट समोर उभं राहून त्याला चूका दाखवणारा खेळाडू पाहिजे असे विराट कोहली म्हणाला आहे. विराटप्रमाणेच भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीवरही वीरेंद्र सेहवागने यापूर्वी टीका केली होती.
" प्रत्येक संघामध्ये 4-5 असे खेळाडू असतात जे कर्णधाराला सल्ला देतात. मैदानात होणार्या चूकांबाबत माहिती देतात. चूकीच्या गोष्टीचा विरोध करतात. मात्र सध्या संघात असा खेळाडू नाही. " असे मत सेहवागने एका मुलाखतीदरम्यान मांडले आहे. संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री कोहलीला सल्ला देत असावेत असेही सेहवाग म्हणाला. "जर संघात काही मतभेद असतील तर ते सार्यांनी एकत्र येऊन दूर करावेत. " असा सल्ला सेहवागने दिला आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर आहे. तीनपैकी दोन टेस्ट मॅच भारतीय संघ हरला आहे. भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रेक्षक आणि दिग्गजही नाराज आहेत. दक्षिण आफ्रिकेतील विराट कोहलीच्या कामगिरीवर आणि वागणूकीवर अनेक दिग्गजांनी टीका केली आहे.
प्रेस कॉन्फरदरम्यान विराटच्या उत्तर देण्याच्या रीतीवरूनही अनेकांनी टीका केली आहे. क्रिकेटर ग्रीम स्मिथनेही विराटच्या वागणूकीवरून त्याच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
ग्रीम स्मिथने एका मुलाखतीदरम्यान विराटच्या वागणूकीबाबत मतं व्यक्त केली आहेत. स्मिथच्या म्हणण्यानुसार, " विराट पुढील किती काळ कर्णधार असेल हे ठाऊक नाही. किंवा त्याला पर्याय कोण असेल हे देखील माहित नाही. परंतू स्वतःच्या देशात आणि परदेशी दौर्यात फरक असतो. कर्णधार म्हणून परदेश दौर्यात 'त्या' खेळाडूवर ताण असतो. तो विराटने समजून घ्यायला हवा."
बीसीसीआयचे माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनीदेखील विराटच्या वागणुकीबाबत प्रश्न उभे केले आहेत.