BCCI चा मोठा निर्णय, आयर्लंड दौऱ्यासाठी द्रविडच्या जागी नवीन कोचची घोषणा

संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे.

Updated: May 25, 2022, 08:27 PM IST
BCCI चा मोठा निर्णय, आयर्लंड दौऱ्यासाठी द्रविडच्या जागी नवीन कोचची घोषणा title=

मुंबई : आयपीएल 2022 नंतर टीम इंडियाला त्यांच्या घरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. या मालिकेनंतर टीम इंडियाला इंग्लंड आणि आयर्लंडचा दौराही करायचा आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी दोन वेगवेगळे संघ तयार केले जाणार आहेत, अशा परिस्थितीत बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आयर्लंड दौऱ्यासाठी नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.

या दिग्गजावर मोठी जबाबदारी

टीम इंडियाला 26 जून ते 28 जून दरम्यान आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे म्हणजेच एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावर संघासोबत जाणार आहेत. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बोर्डाचे सचिव जय शाह यांनी सांगितले की लक्ष्मण संघासोबत डब्लिनला जाणार आहेत.

2 संघ एकत्र दौरा करतील

भारताचा आयर्लंड दौरा 26 जूनपासून सुरू होणार आहे, तर टीम इंडियाला 1 जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध पाचवी आणि अंतिम कसोटी खेळायची आहे. या वेळापत्रकाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी, भारतीय क्रिकेट बोर्डाने 47 वर्षीय लक्ष्मण (VVS लक्ष्मण) यांची NCA च्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली होती. राहुल द्रविडचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती.

यापूर्वीही टीम इंडियामध्ये 2 प्रशिक्षक

गेल्या वर्षीही टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर होती, त्यावेळी एनसीएचे तत्कालीन प्रमुख द्रविडने मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासह श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळला. यावेळी राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे ही जबाबदारी आली आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची अजून घोषणा व्हायची आहे, त्यामुळे या दौऱ्यावर अनेक युवा खेळाडू संघात स्थान मिळू शकते.