MS Dhoni चा नवा व्हिडीओ व्हायरल! मर्सिडीज बेंझ जी क्लास अन् माहीचा स्वॅग; नंबर प्लेट पाहून व्हाल खूश

MS Dhoni Viral Video :  सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून धोनी चाहत्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतलं आहे. या व्हिडओमध्ये एक खास गोष्ट देखील पहायला मिळते.

सौरभ तळेकर | Updated: Nov 29, 2023, 05:46 PM IST
MS Dhoni चा नवा व्हिडीओ व्हायरल! मर्सिडीज बेंझ जी क्लास अन् माहीचा स्वॅग; नंबर प्लेट पाहून व्हाल खूश title=
Video of MS Dhoni Spotted Driving Mercedes Benz G Class

MS Dhoni Driving Mercedes Benz : क्रिकेटप्रमाणे महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) बाईकवर मोठं प्रेम असून बाईक हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून (Viral Video) अनेकदा धोनीसाठी बाईक किती जिव्हाळ्याची गोष्ट आहे याची अनुभूती येते. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून यात धोनी एका मर्सिडीज बेंझ जी क्लासमध्ये (Mercedes Benz G Class) फिरताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून धोनी चाहत्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतलं आहे. या व्हिडओमध्ये एक खास गोष्ट देखील पहायला मिळते.

काही दिवसापूर्वी धोनीचा टेनिस खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. धोनी आगामी आयपीएलसाठी फिटनेसवर भर देताना दिसत आहे. मात्र, धोनी फिटनेसबरोबरच एन्जॉय देखील करताना दिसतोय. काळ्या मर्सिडीज कारमध्ये बसलेला धोनीचा व्हिडिओ रांचीमधून समोर आल्याचं म्हटलं जात आहे. या गाडीचा नंबर आहे, JH01FB0007... तुम्हाली हा नंबर पाहून आनंद झाला असेल. कारण धोनीचा 7 हा गोल्डन नंबर आहे. 

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sumeet Kumar Bajaj (@bajaj.sumeetkumar)

महेंद्रसिंग धोनी जेव्हाही काहीही करतो तेव्हा तो चर्चेत येतो. धोनीला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवलं आहे. यासोबतच धोनीच्या आयपीएलमधील भवितव्याबाबत सुरू असलेल्या अटकळांना तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता धोनी शेवटची आयपीएल खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे. 

चेन्नई सुपर किंग्ज

कायम ठेवलेले खेळाडू : अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महेश तिक्षाणा, मथीशा पथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे , सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे

सोडलेले खेळाडू : आकाश सिंग, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, भगत वर्मा, ड्वेन प्रिटोरियस, काइल जेमिसन, सिसांडा मगला, सुभ्रांशु सेनापती.