VIDEO: दुखापतग्रस्त असतानाही या खेळाडूने टीमला मिळवून दिला विजय

पाकिस्तानात सुरु असलेल्या पीएसएलमधअये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र, दुसरीकडे याच पीएसएलमध्ये एकापेक्षा एक असे रेकॉर्ड्स या टूर्नामेंटमध्ये होताना दिसत आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 3, 2018, 06:07 PM IST
VIDEO: दुखापतग्रस्त असतानाही या खेळाडूने टीमला मिळवून दिला विजय title=

कराची : पाकिस्तानात सुरु असलेल्या पीएसएलमधअये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र, दुसरीकडे याच पीएसएलमध्ये एकापेक्षा एक असे रेकॉर्ड्स या टूर्नामेंटमध्ये होताना दिसत आहेत.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने जबरदस्त कॅच पकडत सर्वांनाच चकीत करुन टाकलं. तर, आता वेस्टइंडिजचा माजी कॅप्टन आणि पीएसएलमधील पेशावर जाल्मीचा कॅप्टन डेरेन सॅमी याने एक कारनामा केलाय.

सॅमीने सर्वांचीच मनं जिंकली

डेरेन सॅमीने पीएसएल क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर जाल्मी यांच्यात खेळलेल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केलीय. ही कामगिरी केल्याने सॅमीने सर्वांचीच मनं जिंकली आहे आणि त्याचं कारणंही तसचं खास आहे.

टीमला विजय मिळवून दिला

डेरेन सॅमी दुखापतग्रस्त असतानाही मैदानात उतरला. त्यावेळी टीमला विजयासाठी ७ बॉल्समध्ये १६ रन्सची आवश्यकता होती. सॅमीने ४ बॉल्समध्ये १६ रन्सची इनिंग खेळत टीमला विजय मिळवून दिला.

पीएसएलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर जाल्मी यांच्यात गुरुवारी (एक मार्च रोजी) ही मॅच यूएईमध्ये खेळण्यात आली. या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करताना ग्लॅडिएटर्सने २० ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावत १४१ रन्स बनवले. 

क्वेटा ग्लॅडिएटर्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पेशावर जाल्मीच्या टीमने १९.४ ओव्हर्समध्येच विजय मिळवला. या मॅचमध्ये ऑलराऊंड प्रदर्शनाचा पुरस्कार डेरेन सॅमी याला देण्यात आला. सॅमीच्या या इनिंगची खास बाब म्हणजे पायाला दुखापत झाली असतानाही त्याने धडाकेबाज बॅटिंग केली आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला.

आपल्या छोट्या इनिंगमध्ये सॅमीने दोन सिक्स आणि एका फोरच्या माध्यमातून १६ रन्स बनवले.