RCB vs CSK, IPL 2023: बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर (M.Chinnaswamy Stadium) झालेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नईने (Chennai Super Kings) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूरचा (Royal Challengers Bangalore) 8 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकात 226 धावा केल्या. मात्र, चेन्नईने दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आरसीबीला 20 षटकांत केवळ 218 धावाच करता आल्या आणि त्यामुळे बंगळुरूला (RCB) 8 धावांनी सामना गमवावा लागला.
चेन्नईविरुद्ध सतत चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला (Virat Kohli) खास कामगिरी करता आली नाही. विराट कोहली सलामीला आल्यानंतर फक्त 6 धावा करू शकला. 4 चेंडूचा सामना करत विराटने 1 फोरच्या मदतीने 6 धावा केल्या होत्या. चेन्नईसाठी खेळणाऱ्या आकाश सिंह (Akash Singh) याने दमदार गोलंदाजी करत थेट किंग कोहलीची विकेट काढली. मात्र, या सामन्यात एक अनोखा प्रकार पहायला मिळाला.
चेन्नई बंगळुरू सामन्यादरम्यान एका चिमुकल्याने स्टेडियममध्ये जोरदार पोस्टर फिरवलं. त्या पोस्टरवर लहान मुलानं विराट कोहलीकडे मुलगी वामिकाला (Vamika Kohli) डेटवर घेऊन जाण्याची परवानगी मागितली आहे. स्टेडियममध्ये लहान चिमुकल्याने एक पोस्टर लावला होता. 'विराट अंकल, तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का?', असं या पोस्टवर लिहिलं होतं.
Your dad might have got 2 min. Attention, but this is wrong in so many angles, not funny at all.
Wrong parenting!! #RCBvCSK #ViratKohli#MSDhoni #Maxwell #duplesis #ShivamDube #AnushkaSharma #vamika pic.twitter.com/Dpyi1iCFQX
— Healer (@Digvinder) April 18, 2023
दरम्यान, आत्तापर्यंतच्या खेळल्या गेलेल्या 5 सामन्यात विराटने 220 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 20 फोर तर, 10 सिक्स खेचले आहेत. तर 3 अर्धशतक देखील विराटने झळकावले आहेत. विराट कोहली यंदा दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यामुळे आता आयसीबी यंदा चॅम्पियन बनणारा का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.