सेक्स लाईफबद्दल विचारलेल्या प्रश्नावर नीरज चोप्रा म्हणाला...

अनेक वेळा नीरज चोप्राला माध्यमांमधून विचित्र प्रश्नांना सामोरं जावं लागलं आहे.

Updated: Sep 5, 2021, 01:55 PM IST
सेक्स लाईफबद्दल विचारलेल्या प्रश्नावर नीरज चोप्रा म्हणाला... title=

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव गोल्ड मेडल मिळालं. नीरज चोप्रा याने हे गोल्ड मेडल भारतासाठी मिळवलं आहे. ही गोल्डन कामगिरी केल्यानंतर जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू नीरज चोप्राचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. त्याच्या कामगिरीमुळे त्याची बरीच प्रशंसाही झाली, परंतु अनेक वेळा त्याला माध्यमांमधून विचित्र प्रश्नांना सामोरं जावं लागलं आहे.

नीरजला विचारले वैयक्तिक प्रश्न

एका मीडिया इव्हेंटमध्ये आर्ट हिस्टोरियन आणि क्युरेटर राजीव सेठी नीरज चोप्राला एक वैयक्तिक प्रश्न विचारला. ज्याबद्दल सोशल मीडियावर राजीवची खूप चर्चा होत आहे. हा प्रश्न ऐकून नीरज सुद्धा खूप अस्वस्थ झालेला दिसून आला.

सेक्स लाइफबाबत विचारला प्रश्न

तू किती सुंदर तरुण आहेस, कोट्यावधी भारतीयांना तुला ही एक गोष्ट विचारायची आहे, पण ते संकोच करतायत, तुम्ही तुमच्या अथलेटिक प्रशिक्षणाला तुमच्या लैंगिक जीवनाशी कसं संतुलित ठेवता? मला माहित आहे की हा एक मूर्ख प्रश्न आहे, परंतु त्याच वेळी हा एक गंभीर प्रश्न देखील आहे. अशा प्रश्न नीरजला विचारला गेला.

नीरजने उत्तर दिलं..

नीरज चोप्राने यावर सॉरी म्हणत या प्रश्नापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. तो पुन्हा म्हणाला, 'सॉरी सर, मी सॉरी म्हणालो, तुम्ही माझं उत्तर यावरून समजू शकता.' राजीव सेठी इथेच थांबले नाहीत, त्यांनी विचारले की, तरुण खेळाडू जे युवा खेळाडू आहेत त्यांचे प्रशिक्षण आणि लैंगिक जीवन कसे संतुलित करतात?

दरम्यान राजीव सेठीच्या प्रश्नावर चाहत्यांनी टीका केली आहे. सोशल मीडियावर एक व्यक्ती म्हणाला की, असा प्रश्न विराट कोहलीला का विचारला जात नाही. दुसर्‍या युजरने राजीवला असभ्य असं म्हटलंय.