ईशान किशनने चोरी केली? ड्रेसिंग रूममध्ये असं काय झालं? रोहितने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video

Rohit Sharma Interview Video: रोहित शर्माने दिलेल्या एका मुलाखतीत ईशान किशनचा एक किस्सा सांगितला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असल्याचं पहायला मिळतंय.

Updated: Aug 13, 2023, 06:37 PM IST
ईशान किशनने चोरी केली? ड्रेसिंग रूममध्ये असं काय झालं? रोहितने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video title=
Rohit Sharma, Ishaan Kishan

Rohit Sharma On Ishan Kishan: सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या मालिकेमध्ये ईशान किशन चांगलाच चर्चेचा विषय राहिलाय. किशनने कसोटी मालिकेत पदार्पण केलं आणि त्याने शानदार अर्धशतकही झळकावलं. यानंतर वनडे मालिकेतही सलग तीन अर्धशतकांचा पाऊस पाडल्याचं दिसून आलंय. त्यानंतर त्याला टी-ट्वेंटीमध्ये संधी मिळाली नसल्याने आता ईशानचं टी-ट्वेंटी संघातील स्थान जाणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. मात्र, कॅप्टन रोहित शर्माने ईशानवर पूर्ण विश्वास दाखवल्याचं पहायला मिळतंय. अशातच रोहितने (Rohit Sharma Interview Video) दिलेल्या मुलाखतीत ईशान किशनचा एक किस्सा सांगितला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असल्याचं पहायला मिळतंय.

नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?

ईशान किशनच्या बॅगमध्ये भलामोठा टेलिफोन भरला. त्याची वायर वेगैरे सगळं काही त्याच्या बॅगमध्ये ठेवलं. त्याला काहीच अंदाज नव्हता. तो बॅग घेऊन सेक्युरिटीकडे पोहोचला. त्यावेळी सेक्युरिटीवाल्यांनी त्याला विचारलं, तू हा फोन कुठं घेऊन चाललाय? हे असं घेऊन जाण्याची परवानगी नाहीये. तू चोरी करतोय का? असा सवाल विचारल्यानंतर ईशान शॉक झाला. नाही सर मी कशाला घेऊन जाईल. माझ्याकडं मोबाईल फोन आहे. एक नाही तर दोन दोन फोन आहेत, असं ईशानने सांगितलं. त्यावेळी हा गंभीर गुन्हा आहे, असं सेक्युरिटी वाल्यांनी त्याला सांगितलं. त्यानंतर ईशान चांगलाच घाबरला, असं रोहित सांगतो. 

ईशानला घाबरवण्यासाठी चॅप चॅपमॅन आणि शेन बॉन्ड यांनी सेक्युरीटी वाल्यासोबत देखील सेटिंग करून ठेवली होती. असा असा एक मुलगा येईल. त्याच्याकडे बॅग येईल. त्याला पकडा आणि त्याला धमकी द्या की, आम्ही तुला जेलमध्ये टाकू... त्यावेळी ईशान फक्त 20 वर्षांचा होता. तो चांगलाच घाबरला. त्याने लगेच मॅनेजरला फोन केला. त्याला सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर मॅनेजरने प्रकरण हाताळलं, असं म्हणत रोहितने ईशानसोबतच्या फजिती केली.

पाहा Video

दरम्यान, ईशान किशन म्हणजे मुंबई इंडियन्सच्या तालमीत तयार झालेला पैलवान. वस्ताद रोहित शर्माकडून पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर ईशानने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात कमी वयातच दुहेरी शतक ठोकून संघातील स्थानावर दावा केला होता. मात्र, अद्याप त्याचं स्थान पक्कं झालं नाही. अशातच आता आगामी वर्ल्ड कप सामन्यात डावखुरा ईशान संघात जागा मिळवेल की नाही, हे पाहणं औत्युक्याचं ठरलं आहे.