IPLमध्ये विकले गेलेले सर्वात महागडे पाच भारतीय खेळाडू कोणते? जाणून घ्या

Most Expensive Indian Player: आयपीएलच्या नव्या सिजनच्या आधी मेगा लिलाव आता काहीच दिवसात होणार आहे. त्या आधी आत्तापर्यंत सर्वाधिक किंमतीला विकल्या गेलेल्या भारतीय खेळाडूचे नाव जाणून घेऊयात. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 7, 2024, 03:35 PM IST
IPLमध्ये विकले गेलेले सर्वात महागडे पाच भारतीय खेळाडू कोणते? जाणून घ्या  title=
Photo Credit: Indian Premier League/X

Most Expensive Indian Player In IPL History: आयपीएल 2025 साठी या वर्षाच्या अखेरीस खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या नियमांनुसार दर तीन वर्षांनी मेगा लिलाव आयोजित केला जातो. नेहमीच्या लिलावात यापूर्वीचे विक्रम मोडीत निघण्याची शक्यता असते. याच निमित्ताने आज आपण जाणून घेऊयात की असे कोणते भारतीय खेळाडू आहेत जे IPL लिलावात सर्वाधिक किंमतीला विकले गेले. 

युवराज सिंग

या यादीत सर्वात पहिले नाव आहे ते म्हणजे युवराज सिंग. भारतीय टीमचा दमदार  फलंदाज युवराज सिंगला 2015 च्या मेगा लिलावात दिल्ली संघाने 16 कोटी रुपयांना विकत घेतले होते. ही भारतीय खेळाडूवर लावलेली आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आहे. युवराज सिंगने भारताला दोनदा विश्वचषक जिंकून देण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

इशान किशन

भारतीय टीमचा युवा खेळाडू  इशान किशननेही संघासाठी शानदार खेळी केली आहे. त्याने मुंबईच्या टीमसाठी अनेक सीजन खेळले आहेत. 2022 लिलावात मुंबईने 15.25 कोटी रुपयांमध्ये ईशानला विकत घेतले होते. या युवा फलंदाजाने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 105 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 99 डावांमध्ये 2644 धावा केल्या आहेत.

हर्षल पटेल

भारताचा दमदार गोलंदाज हर्षल पटेलने त्याच्या खेळीने अनेक फलंदाजांना नाकीनऊ आणले आहे. या गोलंदाजाने भारतासाठी फार कमी क्रिकेट खेळले आहे. हर्षलला 2024 साली पंजाब संघाकडून विकत घेण्यात आले. पंजाबने त्याला 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलचे 106 सामने खेळले आहेत, ज्यामुळे त्याच्या नावावर 124 विकेट्स आहेत.

जयदेव उनाडकट

भारताचा डावखुरा गोलंद जयदेव उनाडकट कोलकाता नाईट रायडर्सने  11 कोटी 50 लाख रुपयांना विकत घेतले होते. 32 वर्षीय जयदेव उनाडकट हा मूळचा गुजरातचा आहे आणि तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. जयदेवने आयपीएलमध्ये एकूण 105 सामने खेळले असून त्याच्या नावावर 99 विकेट आहेत.

गौतम गंभीर

सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला 2011 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने 11 कोटी रुपयांच्या मोठया किमतीत विकत घेतले होते. त्या सिजनच्या लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू होता. केकेआरमध्ये सामील झाल्यानंतर, गंभीरने त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना दोनदा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते. गंभीरने आयपीएलमध्ये 158 सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 4217 धावा आहेत.