कोण आहे बुलबुल साहा? ज्यांच्याशी अरुण लाल यांनी बांधली लग्नगाठ?

दोघांच्या लग्नाचे फोटो लोकांकडून सर्वत्र शेअर केले जात आहेत. 

Updated: May 4, 2022, 04:53 PM IST
कोण आहे बुलबुल साहा? ज्यांच्याशी अरुण लाल यांनी बांधली लग्नगाठ? title=

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू अरुण लाल हे त्यांची प्रेयसी बुलबुल यांच्यासोबत सोमवारी म्हणजेच, 2 मे रोजी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघांमध्ये चक्क 28 वर्षांचा फरक आहे आणि अरुण लाल यांना हे लग्न करण्यासाठी त्यांच्या पहिल्या बायकोनं संमत्ती दिली आहे.

ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर लोकांनी क्रिकेटरचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. लग्नानंतर दोघांचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

दोघांच्या लग्नाचे फोटो लोकांकडून सर्वत्र शेअर केले जात आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अरुण लाल आणि बुलबुल साहा खूप आनंदी दिसत आहेत. तसेच या दोघांचे एकमेकांना किस घेतानाचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

बुलबुल साहा कोण आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, बुलुबल साहा ही व्यवसायाने शाळेत शिक्षक आहेत. पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर अरुण लाल यांनी बुलबुल साहासोबत दुसरे लग्न केले.

बातमीनुसार, पहिल्या पत्नीच्या संमतीनंतरच त्यांनी बुलबुलसोबत दुसरे लग्न केले.

कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, अरुण लाल यांनी भारतासाठी 16 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 729 धावा केल्या. एवढेच नाही तर त्यांनी 13 वनडेत 122 धावा केल्या.

व्हायरल होत असलेले फोटो क्रिकेटरच्या चाहत्यांना खूप आवडतात. 

आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणीशी लग्न केल्याबद्दल काही लोकांनी अरुण लाल यांना ट्रोल देखील केले आहे.

अरुण लाल यांनी त्यांची पहिली पत्नी रीना हिला घटस्फोट दिला होता. मात्र, घटस्फोटानंतरही ती त्याच्यासोबतच राहते, कारण सध्या तिची प्रकृती बिघडत आहे.