एकहाती सामना जिंकवून देण्याचं स्वप्न दाखवणारा कोण आहे मुंबईचा गोलंदाज डॅनियल सॅम्स?

कालच्या सामन्यात चेन्नईच्या चार खेळाडूंना बाद करत त्याने मुंबईला जिंकण्याची आशा दाखवली होती. 

Updated: Apr 22, 2022, 12:52 PM IST
एकहाती सामना जिंकवून देण्याचं स्वप्न दाखवणारा कोण आहे मुंबईचा गोलंदाज डॅनियल सॅम्स? title=

मुंबई : यंदाची आयपीएल म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी जणू एक वाईट स्वप्न आहे. 7 सामने झाले असून मुंबईला अजून एकाही सामन्यात विजय नोंदवता आलेला. दरम्यान सध्या मुंबईच्या एका खेळाडूची जोरदार चर्चा सुरु आहे. हा खेळाडू म्हणजे डॅनियल सॅम्स. कालच्या सामन्यात चेन्नईच्या चार खेळाडूंना बाद करत त्याने मुंबईला जिंकण्याची आशा दाखवली होती. मात्र या धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत संपूर्ण खेळ फिरवला.

डॅनियलने कालच्या सामन्यात उत्तम कामगिरी केली. डॅनियल सॅम्सने मुंबईसाठी सॅम्सने पहिल्याच बॉलवर चेन्नईचा धडाकेबाज ओपनर ऋतुराज गायकवाडला माघारी धाडलं. सॅम्सने चेन्नईला हा पहिला धक्का चेन्नईला दिला. त्यानंतर मिचेल सँटनरची विकेट घेत त्याने दुसरा अडथळाही दूर केला.

16 वर 2 विकेट अशी चेन्नईची स्थिती असताना रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांनी टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. हे दोघं टीमला विजयाच्या दिशेने नेत असतानाच पुन्हा संकटमोचन म्हणून सॅम धावून आला आणि त्याने सेट झालेल्या रायडूला 40 रन्सवर पव्हेलियनमध्ये पाठवलं. इतक्यावर सॅम्स थांबला नाही आणि त्याने शिवम दुबेलाही स्वस्तात माघारी धाडलं. 

4 फलंदाजांना माघारी पाठवत डॅनियलने मुंबईसाठी मोलाची कामगिरी केली. मुंबईच्या टीमला जसप्रीत बुमराहसोबत एक चांगल्या गोलंदाजाची गरज होती. दरम्यान कालच्या सामन्यानंतर सॅम्सने ही कमतरता भरून काढल्याचं दिसून येतंय. कालच्या सामन्यात सॅम्सने सर्वाधिक 4 विकेट्स काढल्या. 

डॅनियल सॅम्स मुळचा ऑस्ट्रेलियाच्या टीमचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसाठी उत्तम कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमने यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये सॅम्सला 2 कोटी 60 लाख रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं.