रोहित शर्मानंतर या स्फोटक फलंदाजाच्या हाती टीम इंडियाची कमान?

कोण होणार टीम इंडियाचा पुढचा कर्णधार? रवी शास्त्री काय म्हणाले पाहा 

Updated: May 3, 2022, 03:25 PM IST
रोहित शर्मानंतर या स्फोटक फलंदाजाच्या हाती टीम इंडियाची कमान? title=

मुंबई : विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माकडे टीम इंडियाचं कर्णधारपद आलं आहे. रोहितनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण होणार याची चर्चा रंगली आहे. निवड समिती चांगल्या कॅप्टनच्या शोधात आहे. आयपीएलच्या निमित्ताने के एल राहुल, हार्दिक पांड्या यांना आजमावण्याची संधी बीसीसीआयला मिळाली आहे. 

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचं नाव टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी आघाडीवर होतं. गुजरात टीमची कामगिरी पाहता त्याने ही जबाबदारी उत्तम पार पडली आहे. त्यामुळे लिमिटेड ओव्हर्समध्ये कर्णधारपदाची जबाबदारी पांड्याकडे जाऊ शकते अशी चर्चा होती. 

आता हार्दिक पांड्या नाही तर आणखी एक पर्याय टीम इंडियाला मिळाला आहे. के एल राहुल देखील उत्तम कर्णधार होऊ शकतो अशी चर्चा आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध सीरिजमध्ये के एल राहुलला विशेष कामगिरी करता आली नाही. 

आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाचे माजी कोच रवि शास्त्री यांनी भविष्यातील कर्णधारपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. रवि शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार के एल राहुल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची नाव आघाडीवर असतील. या तिघांपैकी एकाकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.