IPL 2022 : विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड धोक्यात

कोहलीच्या रेकॉर्डवर परदेशी खेळाडूचा डोळा, पाहा कोण मोडणार 'रनमशीन'चा हा रेकॉर्ड

Updated: May 3, 2022, 03:02 PM IST
IPL 2022 : विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड धोक्यात title=

मुंबई : रनमशीन विराट कोहलीचा विक्रम धोक्यात आला आहे. विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये विशेष कामगिरी करताना फार दिसला नाही. यंदाचा हंगाम त्याच्यासाठी फार चांगला ठरला नाही. कोहलीचा रेकॉर्ड धोक्यात आला आहे. हा रेकॉर्ड जोस बटलर मोडण्याच्या तयारीत आहे.

जोस बटलर विराट कोहलीच्या रेकॉर्डच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे कोहलीचा रेकॉर्ड धोक्यात आला आहे. 2016 मध्ये कोहलीने 973 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 4 शतक ठोकले होते. बटलरने 10 सामन्यात 588 धावा केल्या. यंदाच्या हंगामात बटलर कोहलीचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडू शकतो.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात बटलरने 10 डावांमध्ये 588 धावा केल्या आहेत. 2016 मध्ये कोहलीने पहिल्या 10 सामन्यात 568 धावा केल्या होत्या. त्यामुळे या बाबतीत तर बटलर कोहलीच्या पुढे पोहोचला आहे. बटलरच्या तुफानी खेळीनं सर्वांना हादरवून टाकलं. 

राजस्थानला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी
संजू सॅमसनच्या राजस्थान टीमला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. आयपीएलच्या 10 पैकी 6 सामन्यात राजस्थानचा विजय झाला आहे. 4 सामने गमवावे लागले आहेत. युजवेंद्र चहलची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.