India vs Sri Lanka, 2nd ODI: टीम इंडियाने टी-ट्वेंटी पाठोपाठ श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेली वनडे मालिका देखील (India Beat Sri lanka) सहजपणे जिंकली. या मालिका विजयसह भारताने मिशन वर्ल्ड कपला (ODI World Cup) दमदार सुरुवात केल्याचं दिसतंय. भेदक गोलंदाजी आणि सुमार फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात (Ind vs SL) श्रीलंकेवर चार विकेट्स राखून मात केली. या विजयासह भारताने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशातच के एल राहुलचा सामन्यातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (IND vs SL 2nd ODI Watch Video KL Rahul Tries To Emulate MS Dhoni Fails Badly marathi news)
उपकर्णधारपद गेल्यानंतर केएल राहुलकडे (KL Rahul) विकेटकिपिंगची जबाबदारी आहे. मॅचच्या 15व्या ओव्हरमध्ये राहुल हिरो बनण्यासाठी गेला पण झालं उलटं... या ओव्हरमध्ये राहुलने महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) शैलीत बॅटरला बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुलला कार्यक्रम काही जमला नाही.
सामन्याच्या 15 व्या षटकात नुवानिडू फर्नांडो आणि कुसल मेंडिस मैदानात होते. त्यानंतर फर्नांडोने हार्दिक पांड्याच्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने शॉट मारला. फटकेबाजीनंतर बॅटर दोन रन घेतल्या लागले आणि बॉड्रीवर फिल्डिंग करणाऱ्या सूर्यकुमार यादवने बॉल कीपरच्या दिशेनं फेकला.
पाहा Video -
Hadd h yarr, dhoni bnega ye ?? pic.twitter.com/HRfxbXckda
— Saddam Ali (@SaddamAli7786) January 12, 2023
आणखी वाचा - MS Dhoni: तेव्हा कॅप्टन धोनी गंभीरला काय म्हणाला होता? 11 वर्षानंतर केला खुलासा!
दरम्यान, राहुल स्टंपसमोर उभा जात असलेला बॉल पकडला आणि धोनीच्या स्टाईलमध्ये न बघता चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला (KL Rahul Tries To Emulate MS Dhoni). मात्र, चेंडू स्टंपला लागला नाही. त्यामुळे रन आऊट होता होता राहिला. या घटनेमुळे ट्रोलर्सने धोनीची आठवण काढत सोशल मीडियावर (KL Rahul Stumping) राहुलची खिल्ली उडवत आहेत.