Sania Mirza Divorced Shoaib Malik Know the reason : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकं शनिवारी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरा निकाह केला. त्यामुळे भारतीय टेनिसपटू सानिया आणि शोएबचा घटस्फोट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शोएब मलिकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या लग्नाची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सानियानं शोएबपासून विभक्त होण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा झाला आहे.
मात्र, द पाकिस्तान डेलीच्या एका रिपोर्टनुसार एक मोठा खुलासा झाला आहे. शोएबच्या लग्नात त्याच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हतं. याशिवाय सानिया शोएबपासून विभक्त का झाली त्याचं कारण समोर आलंय. सानिया मिर्झाचे वडील यांनी शोएब मलिकसोबत सानियानं खुला घेतल्याचे सांगितले. रिपोर्टनुसार, असं म्हटलं जातं की सानिया मिर्झाला शोएब मलिकच्या कथित विवाहबाह्यसंबंध म्हणजेच (Extramarital Affairs) ला कंटाळली होती. तर हा खुलासा शोएब मलिकच्या बहिणीच्या कुटुंबातून करण्यात आला. ते दोघं गेल्या अनेक दिवसांपासून वेगळे राहत होते, अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान, आता शोएबनं तिसरं लग्न करत या बातमीला पुर्णविराम लावला आहे.
हेही वाचा : सानिया आधी कोण होती शोएबची भारतीय पत्नी? घटस्फोट न देताच करणार होता दुसरा निकाह
खुला हा घटस्फोटाचा एक वेगळा प्रकार आहे. त्याच्यात आणि घटस्फोटात फक्त इतकाच फरक आहे की हा महिलेकडून देण्यात येतो. खुलाच्या मदतीनं एखादी महिला ही तिच्या नवऱ्यासोबतचे सगळे संबंध तोडू शकते. घटस्फोटात पुरुष त्याच्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतो, तर दुसरीकडे खुलामध्ये महिला तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते. 'खुला' साठी पती आणि पत्नी दोघांचा होकार असणं गरजेचं असते. खुलाची प्रक्रिया ही त्या मुस्लिम महिलांना संन्मानानं घटस्फोट घेण्याचा पर्याय समोर ठेवते. खुला त्या महिला घेऊ शकतात ज्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नाहीत. एकदा घटस्फोट दिल्यानंतर पत्नीला तिचा हक्क असेलेल्या संपत्तीचा काही भाग सोडावा लागतो नाही तर काही अधिकार सोडावे लागतात.