Ind vs Ban U19 : अंडर 19 संघाच्या वनडे वर्ल्ड कप प्रवासाला आजपासून सुरूवात झाली आहे. टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध (India vs Bangladesh) खेळवला जातोय. या सामन्यात बांगलादेश संघाने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने 31 धावांवर 2 विकेट गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेल्याचं पहायला मिळालं. अशातच आदर्श सिंग (Adarsh Singh) आणि कर्णधार उदय सहारन (Uday Saharan) यांनी सुत्र हातात घेतली अन् संघाची धावसंख्या 100 पार पोहोचवली. मात्र, उदय सहारन याचं खेळ पाहून बांगलादेशला टेन्शन आलं. त्यामुळे मैदानात राडा (fight during live match) झाल्याचं पहायला मिळालं.
आदर्श सिंग आणि उदय सहारन यांनी पहिल्या 20 ओव्हर खेळून काढल्या अन् नंतर घेर बदलले. त्यामुळे बांगलादेशचे गोलंदाज बावचळले. बांगलादेशचे खेळाडू आरिफुल इस्लाम आणि महफुजुर रहमान रब्बी यांनी उदय सहारन याला डिवचण्याचा प्रयत्न केला. सात्त्याने ही गोष्ट होत असल्याने उदय सहारनने देखील बांगलादेशचे गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिलं. आरिफुल इस्लाम याची 25 वी ओव्हर सुरू असताना राडा सुरू झाला. आरिफुल इस्लाम याने उदयला खुन्नस दिल्यानंतर उदयने देखील डोळे दाखवले. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
आरिफुल इस्लाम याची चूक लक्षात येताच अंपायरने मध्यस्ती करत दोन्ही खेळाडूंना बाजूला केलं. त्याचवेळी महफुजुर रहमान रब्बी देखील मैदानात आला अन् त्याने देखील भारतीय कर्णधाराला डिवचलं. त्यावेळी देखील अंपायरने दोन्ही खेळाडूंना बाजूला केलं. त्यावेळी टीम इंडियाची धावसंख्या 118 धावांवर 2 विकेट्स अशी होती.
पाहा Video
— Sitaraman (@Sitaraman112971) January 20, 2024
बांगलादेशचा संघ - आशिकुर रहमान शिबली (wk), जिशान आलम, चौधरी मो. रिझवान, अरिफुल इस्लाम, अहरार अमीन, मोहम्मद शिहाब जेम्स, महफुजुर रहमान रब्बी (C), शेख पावेझ जिबोन, मोहम्मद इक्बाल हुसेन एमोन, मारुफ मृधा, रोहनत दौल्ला बोरसन.
टीम इंडिया - आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (C), सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (WK), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी.