व्हिडिओ : जेव्हा क्लिस्टर्सनं मैदानात पुरुषाला घातलं स्कर्ट!

बिम्बल्डन आपल्या कठोर ड्रेसकोडसाठी प्रसिद्ध आहे. या टूर्नामेंटमध्ये खेळाडू केवळ आणि केवळ सफेद रंगाच्या ड्रेसमध्येच कोर्टवर खेळण्यासाठी उतरु शकतात. परंतु, या विम्बल्डनमध्ये ड्रेससंदर्भात एक मजेशीर किस्साही पाहायला मिळाला. 

Updated: Jul 15, 2017, 08:51 PM IST
व्हिडिओ : जेव्हा क्लिस्टर्सनं मैदानात पुरुषाला घातलं स्कर्ट!

लंडन : बिम्बल्डन आपल्या कठोर ड्रेसकोडसाठी प्रसिद्ध आहे. या टूर्नामेंटमध्ये खेळाडू केवळ आणि केवळ सफेद रंगाच्या ड्रेसमध्येच कोर्टवर खेळण्यासाठी उतरु शकतात. परंतु, या विम्बल्डनमध्ये ड्रेससंदर्भात एक मजेशीर किस्साही पाहायला मिळाला. 

महिलांच्या इन्विटेशन डबल्स कॉम्पिटिशन दरम्यान निवृत्ती स्विकारलेल्या बेल्जियमच्या किम क्लिस्टर्स हिला एक भन्नाट कल्पना सुचली... आणि त्यानंतर तिनं असं काही केलं... की सगळे पाहातच राहिले.

त्याचं झालं असं की, मॅच दरम्यान क्लिस्टर्सनं गॅलरीमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनाच 'कुठून सर्व्हिस करायला हवी?' असा प्रश्न विचारला... तेव्हा कुणीतरी 'बॉडीवर' असं म्हटलं... मग काय... क्लिस्टर्सनं त्याच प्रेक्षकाला कोर्टवर येण्याची विनंती केली... तिनं त्याच्या हाती रॅकेट दिलं.. आणि मग सफेद स्कर्टही घेऊन आली... आणि मग पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा...