विम्बल्डन : रॉजर फेडरर पुरुष एकेरी फायनलमध्ये दाखल

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं अकराव्या वेळी विम्बल्डनच्या पुरुष एकेरी फायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमी फायनलमध्ये झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डिचचे कडवं आव्हान फेडररनं सरळ तीन सेटमध्ये मोडीत काढत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 15, 2017, 09:35 AM IST
विम्बल्डन : रॉजर फेडरर पुरुष एकेरी फायनलमध्ये दाखल

विम्बल्डन : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं अकराव्या वेळी विम्बल्डनच्या पुरुष एकेरी फायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमी फायनलमध्ये झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डिचचे कडवं आव्हान फेडररनं सरळ तीन सेटमध्ये मोडीत काढत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.

दोन तास १८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पहिले दोन्ही सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर ही लढत फेडररला काहीशी कठीण जाणार असं दिसत होते. मात्र, तिस-या सेटमध्ये त्याने सातवा गेम जिंकताना बर्डिचची सर्विस भेदून निर्णायक आघाडी घेतली. 

यानंतर मॅच जास्त लांबणार नाही याची काळजी घेत फेडररने सहजपणे फायनल गाठली. विक्रमी आठव्या विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररची फायनलमध्ये मारियन चिलीचमध्ये रंगेल.