WIvsENG : आई गेल्याचं समजल्यानंतरही 'तो' खेळतच राहिला

आपल्या खेळाडूच्या दुखा:त वेस्ट इंडिजचा संघ देखील सहभागी झाला.

Updated: Feb 3, 2019, 11:54 AM IST
WIvsENG : आई गेल्याचं समजल्यानंतरही 'तो' खेळतच राहिला     title=

एटींग्वा : खेळाडूंना अनेकदा क्रिकेट सामन्यांमुळे आपल्या कुंटुंबापासून दुर रहावे लागते. तसेच देशासाठी खेळत असल्याने आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या संघाला प्रथम प्राधान्य द्यावे लागते. आपल्यात असल्याचे खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन वेस्टइंडिजच्या वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने केले आहे. 

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात एटींग्वा येथे हा दुसरा कसोटी सामना सुरु होता. या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी, अल्झारी जोसेफला आपल्या आईचे निधन झाल्याचे वृत्त समजले. अशा दु:खद प्रसंगी देखील, त्याने आपल्या घराकडे धाव न घेता, तो संघासाठी मैदानात उतरला. यावेळी स्टेडिअम मध्ये उपस्थित क्रिकेट प्रेक्षकांनी अल्झारी जोसेफच्या या खिलाडू वृत्तीला उभे राहून सलाम केले. 

 

आपल्या खेळाडूच्या दुखा:त वेस्ट इंडिजचा संघ देखील सहभागी झाला. वेस्ट इंडिजच्या संघाने काळी फित बांधून अल्झारी जोसेफच्या सोबत असल्याची जाणीव करुन दिली. ही दुख:द घटना समजल्यावर वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी अल्झारी जोसेफ सोबत संवाद साधून त्याचे सांत्वन केले.

 

 

इंग्लंडचा वेस्टइंडिज दौरा

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजने ३८१ धावांनी जिंकला. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवशी १० विकेटने विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने २-० अशी आघाडी घेतली. तर तिसरी कसोटी ९ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे.