ऑकलंड : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि थरारक सामन्यात महिला साऊथ अफ्रिकेने (South Africa Women) टीम इंडियावर (India Women) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पोहचण्याचं पर्यायाने वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न हे अधुरंच राहिलं. एका नो बॉलमुळे टीम इंडियाचा गेम झाला अन सर्वच संपलं. (womens world cup 2022 saw vs iw south africa womens beat team india womens by 3 wickets at hagley oval christchurch)
टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 275 धावांचं आव्हान हे आफ्रिकेने 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या 20 व्या ओव्हरमध्ये 7 धावांची गरज होती. दिप्ती शर्माने (Dipti Sharma) ही निर्णायक ओव्हर टाकली. दुसऱ्या चेंडूवर त्रिशा चेट्टीने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) अचूक थ्रोमुळे त्रिशा रनआऊट झाली. ओव्हरच्या 5 व्या बॉलवर प्रीजला हरमनप्रीतच्या हाती कॅच आऊट केलं. मात्र दुर्देवाने तो नो बॉल होता आणि इथेच टीम इंडियाचा गेम झाला.
सर्व मॅच इथेच फिरली. अशा प्रकारे आफ्रिकेने शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 रन्स घेत विजय साकारला अन् टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील प्रवासाला पूर्णविराम लागला.
Proud of u girls ! Well played ! Not a no ball pic.twitter.com/wWKAkgN0mN
— Arpit Awasthi (@arpzrocz) March 27, 2022