लंडन : वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. याआधी श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडला पराभवाचा धक्का लागला होता. यानंतर इंग्लंडच्या टीममधलं टेन्शन वाढलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचआधी अर्जुन तेंडुलकरने इंग्लंडच्या टीमची मदत केली आहे. इंग्लंडची टीम नेटमध्ये सराव करत असताना अर्जुन तेंडुलकरने बॉलिंग केली.
भगव्या रंगाचा टी शर्ट घातलेल्या अर्जुन तेंडुलकरने इंग्लंडच्या स्पिन बॉलिंगचे सल्लागार शकलेन मुश्ताक यांच्या देखरेखीखाली इंग्लंडच्या बॅट्समनना बॉलिंग केली. इंग्लंडच्या बॅट्समनना सराव देण्याची अर्जुन तेंडुलकरची ही पहिली वेळ नाही. याआधी २०१५ साली एशेस टेस्ट आधी अर्जुन तेंडुलकरने १५ वर्षीय खेळाडू म्हणून इंग्लंडच्या बॅट्समनना सराव दिला होता.
England have had a Tendulkar helping them out ahead of #ENGvAUS at Lord's! #CWC19 pic.twitter.com/Yl8OmN8p46
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 24, 2019
१९ वर्षांच्या अर्जुन तेंडुलकरने मागच्या आठवड्यात एमसीसी यंग क्रिकेटर्सकडून खेळताना सरे सेकंड इलेव्हनविरुद्ध दोन विकेट घेतल्या होत्या. अर्जुन सध्या इंग्लिश काऊंटी सेकंड डिव्हिजनमध्ये खेळत आहे. अर्जुन पूर्ण मेहनत घेऊन इंग्लंडच्या बॅट्समनसमोर बॉलिंग करताना दिसत आहे.