ब्रिस्टल : २०१९ वर्ल्ड कपची आपली पहिली मॅच ऑस्ट्रेलिया शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. पण या मॅचआधी ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर फिट झाला तरच ही मॅच खेळणार असल्याचं ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितलं. डेव्हिड वॉर्नरच्या कंबरेत्या मांसपेशींना दुखापत झाली आहे.
'बुधवारी वॉर्नरच्या मांसपेशींना सूज आली होती, पण त्याला सराव सामना खेळायचा होता. सगळ्या १५ खेळाडूंप्रमाणे त्यालाही सहभागी व्हायचं होतं. वॉर्नर फिट होण्यासाठी मेहनत करत आहे. पण त्याचं पूर्णपणे फिट होणं महत्त्वाचं आहे,' असं लँगर म्हणाले.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी वॉर्नर फिट झाला नाही तर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा ओपनिंगला खेळतील.
एरॉन फिंच (कॅप्टन), जेसन बेहरनडॉर्फ, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन कॉल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हि़ड वॉर्नर, एडम झॅम्पा