close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019: वर्ल्ड कप टीममधून शेवटच्या क्षणी डावललं, जुनैद खानचा तोंडाला पट्टी बांधून निषेध

३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

Updated: May 20, 2019, 10:54 PM IST
World Cup 2019: वर्ल्ड कप टीममधून शेवटच्या क्षणी डावललं, जुनैद खानचा तोंडाला पट्टी बांधून निषेध

मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपला १० दिवस बाकी असतानाच पाकिस्तानच्या टीमने शेवटच्या क्षणी टीममध्ये तीन बदल केले. पाकिस्तान टीमने आबिद अली आणि जुनैद खान यांना बाहेर करून आसिफ अली आणि आमिरला टीममध्ये घेतलं. तर फहीम अशरफच्या जागी वहाब रियाजची निवड करण्यात आली.

शेवटच्या क्षणी टीममधून काढून टाकल्यामुळे जुनैद खानने बंड केलं आहे. जुनैद खानने ट्विटरवर तोंडाला काळी पट्टी बांधून स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. 'मला काहीही बोलायचं नाही, पण सत्य कटू असतं', असं कॅप्शन जुनैद खानने या फोटोला दिलं आहे.

Junaid Khan

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना ३१ मे रोजी वेस्टइंडिजविरुद्ध होणार आहे.

२९ वर्षांच्या जुनैद खानने ७६ वनडे, २२ टेस्ट आणि ९ टी-२० मॅच खेळल्या आहेत. जुनैदने वनडेमध्ये ११० विकेट, टेस्टमध्ये ७१ आणि टी-२०मध्ये ८ विकेट घेतल्या आहेत. जुनैदने २०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली, पण पहिल्यांदाच त्याला वर्ल्ड कपच्या टीममध्ये संधी मिळाली नाही.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये ४ मॅच पाकिस्तानने गमावल्या, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. या सीरिजच्या प्रत्येक मॅचमध्ये इंग्लंडने ३५० पेक्षा जास्त रन केले. यानंतर पाकिस्तानच्या बॉलवर जोरदार टीका झाली.

'इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानच्या बॉलरनी निराशाजनक कामगिरी केली. यामुळे आम्ही टीममध्ये बदलाव केले. वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या मॅच या बॅटिंगला अनुकूल असणाऱ्या खेळपट्ट्यांवर होतील', असं निवड समितीचे अध्यक्ष इंजमाम उल हक म्हणाले.

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम

सरफराज अहमद (कर्णधार), आसिफ अली, बाबर आझम, फखर जमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसैन, शादाब खान, शाहिन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाज