World Cup 2019 : म्हणून वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल विकेट घेतल्यावर सल्यूट करतो

वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू हे नेहमीच त्यांच्या मैदानतल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहेत.

Updated: Jun 6, 2019, 09:06 PM IST
World Cup 2019 : म्हणून वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल विकेट घेतल्यावर सल्यूट करतो title=

नॉटिंगहम : वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू हे नेहमीच त्यांच्या मैदानतल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहेत. फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेल यांचं सेलिब्रेशनही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पहिले पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी आणि मग आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये शेल्डन कॉट्रेलने लष्कराच्या जवानासारखा सल्यूट करून सेलिब्रेशन केलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये कॉट्रेलने पहिले डेव्हिड वॉर्नर आणि मग ग्लेन मॅक्सवेलला माघारी धाडलं. या दोन विकेट घेतल्यानंतर शेल्डन कॉट्रेलने त्याच्या नेहमीच्या शैलीत सेलिब्रेशन केलं. वेस्ट इंडिजचे कॉमेंटेटर इयन बिशप यांनी कॉट्रेलच्या या सेलिब्रेशनचं कारण सांगितलं.

शेल्डन कॉट्रेल हा जमैकाच्या लष्कराचा जवान आहे. जमैकाच्या लष्करामधल्या सहकाऱ्यांना मान देण्यासाठी कॉट्रेल विकेट घेतल्यावर लष्करी जवानासारखा सल्यूट करतो.

'विकेट घेतल्यानंतर मी लष्कराच्या जवानासारखा सल्यूट करतो. मी स्वत: जमैकाच्या लष्कराचा जवान आहे. जमैकाच्या लष्कराचा आदर म्हणून मी विकेट घेतल्यावर असा सल्यूट करतो. मी लष्कराचं ट्रेनिंग घेतलं तेव्हा सहा महिने सल्यूट करायला शिकलो,' असं कॉट्रेलने याआधी सांगितलं आहे. शेल्डन कॉट्रेलने वेस्ट इंडिजकडून खेळताना १५ वनडे इनिंगमध्ये २० विकेट घेतल्या आहेत. 

p>