close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : पाकिस्तान टीममध्ये नसलेल्या उमर अकमलची 'चूक', ट्विटरवर ट्रोल

वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी टीमवर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात येत आहे.

Updated: Jun 19, 2019, 07:00 PM IST
World Cup 2019 : पाकिस्तान टीममध्ये नसलेल्या उमर अकमलची 'चूक', ट्विटरवर ट्रोल

मुंबई : वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी टीमवर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंबरोबरच त्यांचे चाहतेही टीमवर निशाणा साधत आहेत. यातच भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचं कौतुक करणं उमर अकमलला चांगलंच महागात पडलं आहे.

वर्ल्ड कपसाठीच्या पाकिस्तानी टीममध्ये उमर अकमलची निवड करण्यात आलेली नाही. पण तरीदेखील त्यालाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मॅचनंतर उमर अकमलने एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्याने भारताच्या आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचं कौतुक केलं. पण या ट्विटमध्ये त्याने चुकीच्या माणसांना टॅग केलं.

अकमल ट्विटरवर म्हणाला, 'विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत भारत एक चांगली टीम होती. आपण दिग्गज बॅट्समन असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. तर पाकिस्तानकडून आमिरने चांगली बॉलिंग केली. फकर आणि बाबरनेही चांगला खेळ केला. पण यानंतर चांगली पार्टनरशीप झाली नाही,' असं ट्विट उमर अकमलने केलं. पण या ट्विटमध्ये उमर अकमलने वेगळ्याच आमिर, फकर आणि बाबरला टॅग केलं.

उमर अकमलच्या या चुकीनंतर त्याच्यावर ट्विटरवर जोरदार टीका करण्यात आली. तसंच यूजर्सनी उमर अकमलला त्याच्या इंग्रजीवरूनही लक्ष्य केलं.

रविवारी मॅनचेस्टरमध्ये झालेल्या या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा ८९ रननी पराभव केला. याचबरोबर भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं रेकॉर्डही कायम ठेवलं. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान यांच्यात ७ मॅच झाल्या. या सगळ्या ७ मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे.