मुंबई : हरियाणाचे सोनीपत बुधवारी अचानक सोशल मीडियावर चर्चेत आले. कारण..सोनीपतच्या खरखोडा विधानसभा मतदारसंघातील हलालपूर गावात दिवसाढवळ्या तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्यात एक मुलगी, एक मुलगा आणि एका महिलेचा समावेश होता.
या प्रकरणाची चौकशी केली असता मृत मुलगी व मुलगा दोघेही सख्खे भाऊ- बहिण असल्याचे निष्पन्न झाले. ही मुलगी कुस्तीपट्टू असल्याचे कळताच ही बातमी वाऱ्यासारखा पसरली. तिचे नाव कुस्तीपट्टू निशा दहिया होते. अनेक सोशल मीडिया युझर्सने वाटले की, जिचा मृत्यू झाला ती राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया आहे. एकामागून एक मेसेज शेअर होऊ लागले.
लोकांनी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे ते ट्विट देखील शेअर केले. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी सर्बियामध्ये 23 वर्षांखालील पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. त्यामध्ये राष्ट्रीय कुस्तीपट्टू निशा दहियाच्या नावाचा उल्लेख होता. मात्र संपू्र्ण घटनेने थोड्यावेळातच यूटर्न घेतला. जेव्हा राष्ट्रीय कुस्तीपट्टू निशा दहियाने सोशल मीडियावर आपल सुरक्षित असल्याचा लाईव्ह व्हिडिओ शेअर केला. ('हत्येची बातमी चुकीची', कुस्तीपट्टू निशा दहियाने दिली सुरक्षित असल्याची माहिती)
हळू हळू गोष्टी स्पष्ट होत गेल्या. नंतर मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात ज्या मुलीची हत्या झाली ती निशा दहिया कुणी दुसरी होती. आणि ती सोनीपत येथे राहणारी होती. आणि सोशल मीडियावर ज्या निशाच्या नावाची चर्चा होती ती पानीपतमध्ये राहणारी होती. नावात काय असतं? असं म्हटलं जातं. मात्र नावातच सारं काही आहे हे या घटनेवरून अधोरेखित झालं. एकाच नावामुळे किती गोंधळ उडाला याचं हे मूर्तीमंत उदाहरण.
हरियाणाच्या सोनीपतमध्ये बुधवारी संध्याकाळी दुहेरी हत्या घडली. आरोपीने महिला कुस्तीपटू, तिचा भाऊ आणि आईवर गोळ्या झाडल्या. महिला कुस्तीपटू आणि तिच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. तर आईला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र या बातमीने बुधवारी सोशल मीडियावर खळबळ उडाली. आणि गदारोळ झाला कारण मृत्यू झालेल्या महिला कुस्तीपटूचे नाव निशा दहिया होते. ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांना वाटले की ही राष्ट्रीय रेसलर निशा दहिया आहे. आणि पटकन ही बातमी शेअर करायला सुरुवात केली. परिस्थिती अशी बनली की राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहियाला सोशल मीडियावर येऊन ती ठीक असल्याचे स्वत:हून सांगावे लागले. मुलगी सुमारे 20 वर्षांची होती..तिची आणि तिच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. येथे प्रशिक्षण घेत होती. अकादमीत जी जाळपोळ झाली होती..तिचाही तपास सुरू आहे. हत्या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.