युजवेंद्र चहलने रचला इतिहास, वनडेमध्ये ७ मोेठे रेकॉर्ड

युजवेंद्र चहलने दमदार प्रदर्शन करत मेलबर्नमध्ये रचला इतिहास

Updated: Jan 18, 2019, 07:05 PM IST
युजवेंद्र चहलने रचला इतिहास, वनडेमध्ये ७ मोेठे रेकॉर्ड title=

मेलबर्न : युजवेंद्र चहलने दमदार प्रदर्शन करत मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये 42 रन देत ६ विकेट घेत इतिहास रचला आहे. त्यांच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाची टीम 230 रनवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियासाठी पीटर हँड्सकॉम्बने सर्वाधिक 58 रन केले. या सीरीजमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या युजवेंद्र चहलने 10 ओव्हरमध्ये 42 रन देत 6 विकेट घेतले आणि ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर वनडेमध्ये 6 विकेट घेणारा पहिला स्पिनर बनला आहे. चहल वनडे आणि टी-20 मध्ये 6 विकेट घेणारा अजंता मेडिंसनंतर जगातील दुसरा स्पिनर बनला आहे.

चहल ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सामन्यात ५ विकेट घेणारा जगातील आठवा गोलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध भारतीय स्पिनरचा हा आतापर्यंतचं वनडेमध्ये तिसरी सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. याआधी रवी शास्त्री यांनी 1991 मध्ये पर्थच्या मैदानावर 5 विकेट घेतले होते. ऑस्ट्रेलियामध्ये अशी कामगिरी करणारा चहल दुसरा भारतीय स्पिनर बनला आहे.

वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय स्पिनरचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन

6/27- मुरली कार्तिक, मुंबई, 2007
6/42- अजीत अगरकर, एमसीजी, 2004
6/42-युजवेंद्र चहल, एमसीजी, 2019*

चहल भारता बाहेर वनडेमध्ये २ वेळा 5 विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये वनडेमध्ये ही त्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. 

युजवेंद्र चहलचे 7 रिकॉर्ड

1. युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलियामध्ये वनडेमध्ये 6 विकेट घेणारा जगातील पहिला स्पिनर बनला आहे. याआधी सात स्पिनर्सने ऑस्ट्रेलियामध्ये ६ विकेट घेतले आहे. पण 7 विकेट कोणीच नाही घेऊ शकलं.

2. चहल भारताच्या बाहेर वनडेमध्ये 2 वेळा पाच विकेट घेणारा पहिला भारतीय स्पिनर बनला आहे. त्याने या सामन्याच्या आधी मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 22 रन देत 5 विकेट घेतले होते.

3. चहल कोणत्याही वनडे आणि टी-20 मध्ये 6 विकेट घेणारा जगातील २ स्पिनर बनला आहे. त्याच्या आधी श्रीलंकेच्या अजंता मेडिंसने ही कामगिरी केली आहे.

4. चहलने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध वनडेमध्ये 6 विकेट घेणारा जगातील तिसरा स्पिनर बनला आहे. त्याच्या आधी मुरली कार्तिकने 2007 मध्ये मुंबई वनडे आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने 2009 मध्ये दुबई वनडेमध्ये 6 विकेट घेतले होते.

5. चहल ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही वनडेमध्ये ५ विकेट घेणारा दुसरा भारतीय स्पिनर आणि तिसरे भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याच्या आधी रवी शास्त्रीने 1991 मध्ये पर्थ वनडेमध्ये (15/5) आणि अजीत आगरकरने 2004 मध्ये मेलबर्न वनडेमध्ये (42/6)  अशा कामगिरी केली होती.

6. चहलने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 42/6 अशी कामगिरी करत दुसरा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं आहे. याआधी आगरकरने 2004 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 42 रन देत 4 विकेट घेतले होते.

7. चहल वनडेमध्ये 6 विकेट घेणारा नववा आणि आणि पाचवा भारतीय स्पिनर ठरला आहे. कुलदीप यादव अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय स्पिनर आहे.