IND vs PAK सामन्यावर प्रश्न विचारला अन् सेक्युरी गार्डचं डोकं फिरलं, युट्यूबरची गोळी झाडून हत्या

T20 World Cup 2024, India vs Pakistan: भारत-पाक सामन्यावर प्रश्न विचारल्याने एका युट्यूबरची गोळी झाडून हत्या करण्यात आली. सेक्युरिटी गार्डला (Security guard) पोलिसांनी अटक केलीये.

सौरभ तळेकर | Updated: Jun 11, 2024, 07:41 PM IST
IND vs PAK सामन्यावर प्रश्न विचारला अन् सेक्युरी गार्डचं डोकं फिरलं, युट्यूबरची गोळी झाडून हत्या title=
security guard shoots Youtuber in Karachi India–Pakistan cricket rivalry

Pakistan YouTuber Killed in Karachi: पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India–Pakistan cricket rivalry)यांच्यातील सामना म्हणजे एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो. वर्ल्ड कप हरला तरी चालेल पण पाकिस्तानविरुद्ध पराभव (India vs Pakistan) अमान्यच असतो. आयसीसीच्या ट्रॉफीमध्ये भारताने प्रत्येकवेळी पाकिस्तानला गुघड्यावर टेकवलंय. यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये देखील टीम इंडियाने बाबर अँड कंपनीचा पराभव केला अन् सातव्यांदा विजय नावावर केलाय. मात्र, यंदाही पराभवानंतर टीव्ही फोडण्याची परंपरा पाकिस्तानने कायम ठेवली आहे. एवढंच नाही तर यंदाच्या सामन्यावेळी अजब प्रकार पहायला मिळाला. भारत पाकिस्तान सामन्यावर सतत प्रश्न विचारल्याने एका सेक्युरी गार्डने चक्क एका युट्यूबरची हत्या (YouTuber Saad Ahmad shoots In Karachi) केलीये.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, कराचीमध्ये (Karachi News) राहणाऱ्या साद अहमद नावाचा एक युट्यूबर लोकांमध्ये जाऊन भारत आणि पाकिस्तान सामन्यावर लोकांची मतं जाणून घेत होता. त्यावेळी त्याने व्हिडीओ शूट करत लोकांना विविध प्रश्न विचारू लागला. त्यावेळी अनेकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मोबाईल दुकानदार ते भाजी विकणाऱ्या विक्रेत्याने देखील त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याचवेळी साद अहमद एका सेक्युरिटी गार्डकडे (Security guard) पोहोचला अन् विविध प्रश्न विचारू लागला. त्यावेळी त्याने कामाने कंटाळलेल्या सेक्युरिटी गार्डला अनेक प्रश्न विचारले आणि युट्य़ूबरचा माइक्रोफोन सतत सेक्युरिटी गार्डच्या समोर आणल्याने त्याला राग आला. 

भारत-पाकिस्तान सामन्यावर युट्यूबरने अनेक प्रश्न विचारल्याने सेक्युरिटी गार्डने साद अहमदवर थेट गोळ्या झाडल्या. त्यामुळे साद गंभीर जखमी झाला होता. घडलेला प्रकारानंतर सादला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारावेळी सादचा मुत्यू झाला. या घटनेमुळे कराचीच्या मोबाईल मार्केटमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी तात्काळ सेक्युरिटी गार्डला अटक केली.

दरम्यान, साद अहमद कुटूंबातील एकमेव कमवता व्यक्ती होता, असं त्याचे मित्र सांगतात. साद विवाहित असून त्याला दोन लहान मुलं आहेत. त्यामुळे सादच्या कुटूंबाला मोठा धक्का बसलाय. तर दुसरीकडे एका चुकीच्या निर्णयामुळे सेक्युरिटी गार्डचं कुटूंब देखील रस्त्यावर आलंय. ही घटना बफर झोन परिसरातील सेरिना मोबाइल मॉलजवळ घडली होती. मात्र, संपूर्ण पाकिस्तानमध्ये सध्या याच घटनेची चर्चा होताना दिसत आहे.