Yuzvendra Chahal : निवड समितीने 'ती' घोषणा केली आणि...; बाथरूममध्ये एकटा बसून रडला होता युझी

Yuzvendra Chahal : मैदानात आणि मैदानाबाहेर युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal ) मस्तीखोरपणा प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. दरम्यान पॉडकास्टमध्ये युझवेंद्र चहलने बरेच मोठे खुलासे केले आहेत. यावेळी त्याने मेंटल हेल्थ आणि त्याच्या जोडलेल्या काही कटू आठवणी शेअर केल्या आहेत.

Updated: Jul 17, 2023, 04:15 PM IST
Yuzvendra Chahal : निवड समितीने 'ती' घोषणा केली आणि...; बाथरूममध्ये एकटा बसून रडला होता युझी title=

Yuzvendra Chahal : टीम इंडियामधील ( Team India ) युवा आणि उत्तम स्पिनर म्हणून युझवेंद्र चहलचं ( Yuzvendra Chahal ) नाव घेतलं जातं. मैदानात आणि मैदानाबाहेर युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal ) मस्तीखोरपणा प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. मात्र नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या एक पॉडकास्टमध्ये युझवेंद्र चहलने बरेच मोठे खुलासे केले आहेत. यावेळी त्याने मेंटल हेल्थ आणि त्याच्या जोडलेल्या काही कटू आठवणी शेअर केल्या आहेत. 

युझवेंद्र चहलवर ( Yuzvendra Chahal ) एक वेळ अशी आली होती की तो बाथरूममध्ये जाऊन एकटा रडत होता. युझवेंद्र चहलने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. चहल म्हणाला की, कधी कधी तुम्हाला मानसिक आरोग्याशी देखील झुंजावं लागतं. ज्यावेळी मला 2021 मध्ये UAE मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये ( Team India ) स्थान दिलं नव्हतं तेव्हा मी निराश झालेलो. मला त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं. रात्री साडेनऊ वाजता टीम पोहोचणार होती. टीमचे पत्र ज्यावेळी मी पाहिलं होतं तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. त्या दिवशी बाथरूममध्ये रडलो होतो. 

यावेळी युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) म्हणाला की, जर तुम्ही चांगली कामगिरी करता तर तुम्ही अव्वल स्थानावर असता. एक दिवस असा येतो, ज्यादिवशी प्रत्येत खेळाडूला रिप्लेस केलं जातं. जर मी आज चांगली कामगिरी केली नाही, तर कोणीतरी दुसरा खेळाडू येईल. मात्र मला या गोष्टीने काहीही प्रॉब्लेम नाही. 

टेस्ट टीममध्ये चहलचं केलं नव्हतं सिलेक्शन 

प्रत्येक क्रिकेटरला आपल्या देशीसाठी टेस्ट क्रिकेट खेळावं असं वाटतं. प्रत्येक क्रिकेटपटूप्रमाणे युझवेंद्र चहल  ( Yuzvendra Chahal ) चंही हे स्वप्न होतं. 'मला वाटतं की टेस्ट हेच खरे क्रिकेट आहे. मला वाटतं की तुम्हाला विकेट मिळवण्यासाठी पाच दिवस मेहनत करावी लागेल. तुम्ही थकलेले असता परंतु तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठून गोलंदाजी करावी लागेल. आणि माझ्या हीच खरी कसोटी आहे. मला किमान एक कसोटी सामना खेळायचा आहे.

गेल्या 7 वर्षांपासून युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) टीम इंडियासाठी क्रिकेट खेळतोय. मात्र तरीही त्याचं अजून त्याला एकदाही टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. याच संधीची वाट चहल पाहत असून त्याने याबाबतची खंत बोलून दाखवली आहे.