ब्लू जर्सी घालून धनश्री वर्माकडून टीम इंडियाला सपोर्ट, पण चाहत्यांकडून 'या गोष्टीसाठी खंत व्यक्त

धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

Updated: Oct 21, 2021, 01:26 PM IST
ब्लू जर्सी घालून धनश्री वर्माकडून टीम इंडियाला सपोर्ट, पण चाहत्यांकडून 'या गोष्टीसाठी खंत व्यक्त

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा नेहमीच आपल्या डान्समुळे चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांसाठी दररोज काही ना काही फोटो शेअर करत असते. सध्या धनश्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे. सध्या टी 20 वर्ल्ड कप सुरू झालं आहे, ज्यामुळे देशातील क्रिकेट प्रेमी 24 ऑक्टोंबरची वाट पाहत आहे.

टी 20 वर्ल्ड कपमुळे देशात क्रिकेट फिव्हर सुरू असताना धनश्री वर्माने टीम इंडियाच्या नवीन जर्सीतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती टीम इंडियाच्या नवीन जर्सीमध्ये धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. धनश्रीच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरुन प्रतिक्रिया मिळत आहेत.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने तिच्या डान्स व्हिडीओने टीम इंडियाला चीअर केले आहे. 24 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाला त्याच्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये खेळत आहेत.

धनश्रीने हा मेसेज दिला

धनश्री वर्माने पोस्ट शेअर करताना लिहिले, 'मी माझ्या डान्सद्वारे टी 20 वर्ल्ड कपचा हंगाम सुरू होताच माझा खेळ दाखवत आहे. तुम्ही टीम इंडियाला कसं चीअर करत आहात? धनश्री जरी टी -20 20 वर्ल्ड कपसाठी टीमला चिअर्स करताना दिसत असली तरी, ती आपल्या पतीसाठी हे चिअर्स करु शकणार नाही. तिच्या चाहत्यांना देखील याच गोष्टीची खंत वाटत आहे.

कदाचित युजवेंद्र चाहर टीम इंडियासाठी खेळला असता तर धनश्रीला दुप्पट उत्साहात चाहत्यांना पाहाला मिळाले असते.

युएईमध्ये आयोजित आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात चहलने चमकदार कामगिरी केली. यानंतर निवडकर्ते चहलला संधी देऊ शकतील अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही.
चहलला विश्वचषक संघात संधी मिळाली नाही, तेव्हा धनश्रीने एक भावनिक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने लिहिले, 'आई म्हणते ... की ही वेळही निघून जाईल. डोके उंच करून जगा, कारण कौशल्य आणि चांगली कृत्ये नेहमीच सोबत असतात. तर गोष्टी अशा असतात की ही वेळ देखील निघून जाईल देव महान आहे.'

चहलला संघात न घेण्याबाबत, मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाले होते की, आम्हाला थोडी वेगवान गोलंदाजी करणारे फिरकीपटू हवे होते, म्हणून आम्ही राहुल चहरला संघात समाविष्ट केले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

धनश्री हिप-हॉप डान्सर

धनश्री वर्माचा एक डान्सशी संबंधित एक यूट्यूब चॅनेल आहे, या चॅनेलचे 15 लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. धनश्री बॉलिवूड गाणी पुन्हा तयार करते. याशिवाय ती हिप-हॉपचे प्रशिक्षणही देते. या यूट्यूब चॅनेलवर ती तिच्या डान्स अकादमीचे व्हिडीओही अपलोड करते. धनश्रीने 2014 मध्ये डीवाय पाटील डेंटल कॉलेज नवी मुंबई येथून शिक्षण घेतले आहे.