युजवेंद्रची पत्नी धनश्रीनं सांगितलं कोहली-अनुष्काच्या नात्याचं सिक्रेट

टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असते. 

Updated: Jun 18, 2021, 03:21 PM IST
युजवेंद्रची पत्नी धनश्रीनं सांगितलं कोहली-अनुष्काच्या नात्याचं सिक्रेट

मुंबई: टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असते. सतत ती आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने माहीबद्दल आपलं मत व्यक्त करून सर्वांची मनं जिंकली होती. आता तिने विराट आणि अनुष्काच्या नात्याबद्दलचं खास सिक्रेट चाहत्यांपर्यंत इन्स्टामधून पोहोचवलं आहे. 

धनश्री वर्मा इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत संवाद साधत असताना तिला एकाने विराट आणि अनुष्काबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी तिने दोघांच्या नात्याबद्दलचं सिक्रेट सांगितलं आहे. धनश्रीच्या या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

धनश्री वर्माने अनुष्का शर्मा आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचं खूप कौतुक केलं आहे. अनुष्का खूपच प्रेमळ आणि सुंदर आहे. धनश्रीने विराट आणि अनुष्कासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराटला ग्रेट सेंस ऑफ ह्युमर असल्याचंही धनश्री वर्मा म्हणाली आहे. धनश्रीने दिलेल्या या कमेंटमुळे चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

महेंद्रसिंह धोनीबद्दल काय म्हणाली धनश्री?

 धनश्री वर्माने कॅप्टन कूल धोनीबाबत मन जिंकणारं उत्तर दिल्यानं चाहते देखील आनंदी आहेत. इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी धनश्री वर्माला विचारलं की माही सरांबद्दल तुमचं मत सांगा. धनश्री म्हणाली, लेजेंड त्यांची रिुप्लेसमेंट होऊ शकत नाही. माही खूप नम्र आहे त्याचबरोबर अनेक लोकांचं प्रेरणास्त्रोत आहे. धनश्रीनं दिलेलं उत्तर चाहत्यांना आवडलं.