VIDEO: पंजाबला हरवल्यानंतर धोनीच्या मुलीने व्यक्त केला आनंद

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनगिडीच्या जबरदस्त गोलंदाजीनंतर सुरेश रैनाच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने आयपीएलमध्ये पंजाबला ५ विकेटनी हरवले. 

Updated: May 21, 2018, 03:13 PM IST
VIDEO: पंजाबला हरवल्यानंतर धोनीच्या मुलीने व्यक्त केला आनंद title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनगिडीच्या जबरदस्त गोलंदाजीनंतर सुरेश रैनाच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने आयपीएलमध्ये पंजाबला ५ विकेटनी हरवले. यासोबतच पंजाबचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाला. पंजाबला जर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवायचे असते तर त्यांना चेन्नईला १०० धावा वा त्याहून कमी धावांवर रोखणे गरजेचे होते. पंजाबला हे जमले नाही यासोबतच राजस्थानने प्ले ऑफमध्ये जागा मिळवली. आता चेन्नई हैदराबाद, कोलकाता आणि राजस्थान या संघांनी प्ले ऑफमध्ये जागा मिळवलीये. सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा पुन्हा चर्चेत आलीये. 

या सामन्यात पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना चेन्नईने पाच विकेट गमावताना १५९ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी ७ चेंडूत १६ धावा करताना नाबाद राहिला. धोनीने सामन्याचा शेवट पुन्हा त्या दिमाखदार षटकाराने केला. धोनीने आयपीएलमध्ये ही कमाल पाचव्यांदा केलीये. या सामन्यानंतर झिवा चांगलीच चर्चेत आलीये. या सामन्यानंतर झिवा धोनीसोबत दिसली. आपल्या वडिलांसोबत ती मस्ती करत होती. धोनीही झिवासाठी लहान झाला होता. 

 

Ziva enjoying our win along with papa! #Whistlepodu

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on