उत्तर भारतीय

Mumbai CM Fadanvis On North Indian PT3M31S

मुंबई । शहरात आलेले उत्तर भारतीय भाजपमुळे सुरक्षित - फडणवीस

भाजपचे सरकार आल्यानंतर मुंबईत उत्तर भारतीय लोकांना धमकावणे बंद झाले. धमकावणाऱ्या लोकांना आम्ही त्यांची जागा दाखवली, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत उत्तर भारतीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते खूप जुने आहे. मुंबईच्या आजवरच्या विकासात उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे.

Jan 24, 2019, 11:30 PM IST

मुंबईतील उत्तर भारतीय भाजपमुळे सुरक्षित- फडणवीस

गेल्या साडेचार वर्षात आमचे सरकार असल्यामुळे हे प्रकार बंद झाले आहेत. 

Jan 24, 2019, 11:16 PM IST

मुंबई, महाराष्ट्र ही उत्तर भारतीय चालवतात- संजय निरुपम

संजय निरुपमांचा संतापजनक प्रयत्न

Oct 8, 2018, 02:21 PM IST

'उत्तर भारतीयांनी काम केलं नाही तर मुंबई थांबेल'

मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात.

Oct 7, 2018, 10:27 PM IST

गोव्यात सर्वांचचं स्वागत मात्र, रस्त्यावर 'हे' करु नका - मनोहर पर्रीकर

गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 15, 2018, 09:48 AM IST

मुंबई | उत्तर भारतीयांच्या मुद्यावर मनसे vs नाना - फडणवीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 07:16 PM IST

मुंबई महापालिकेआधी भाजपचा उत्तर भारतीय मतांवर डोळा

मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेऊन भाजपानं उत्तर भारतीयांना चुचकारण्यास सुरूवात केली आहे.

Sep 1, 2016, 07:39 PM IST

भाजपचा उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा, खास 'चोखा बाटी'चे आयोजन

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपने कंबर कसली आहे.'चोखा बाटी' हा उत्तर भारतीयांमध्ये एका खाद्य पदार्थाशी संबंधित असलेला कार्यक्रम मोठया प्रमाणात आयोजित करण्याचे भाजपने ठरवले आहे. 

Aug 20, 2016, 05:53 PM IST

उत्तर भारतीयांच्या मतांवर मुंबई भाजपचा डोळा

मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.

Nov 6, 2013, 12:25 PM IST

राज ठाकरेंची तातडीनं चौकशी करा - न्यायालयाचे आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्यांचा तपास वेगानं केला जावा, असे आदेश दिल्ली कोर्टानं दिलेत. राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीयांना घुसखोर असं संबोधलं होतं.

Mar 8, 2013, 10:50 AM IST

उत्तर भारतीय नेत्यांना मराठी माणसाचे वावडे- राज

`दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचं नेहमीच वावडं आहे, त्यामुळेच नितीन गडकरी यांना बाजूला सारण्यात आलं आहे.`

Jan 24, 2013, 12:07 PM IST

उत्तर भारतीयांना हवी मुंबईतील ४० एकर जमीन

मुंबईमध्ये स्थानिक पक्षांचा उत्तर भारतीयांविरुद्ध सुरू असणारा राडा थंड होताच उत्तर भारतीयांनी मुंबईमध्ये ४० एकर जागा मागितली आहे. यामुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये उत्तर भारतीयांसाठी विद्यापीठ स्थापन करायचं असून त्यासाठी ४० एकर जागेची मागणी उत्तर भारतीय संघाने राज्य सरकारकडे केली आहे.

Dec 20, 2012, 10:47 PM IST

उत्तर भारतीयाला महाराष्ट्रात आरक्षण कसे?

उत्तर भारतीयाला महाराष्ट्रात आरक्षण कसे दिले जाऊ शकते, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यांना महाराष्ट्रात आरक्षणाची सुविधा कशी मिळू शकते, अशी विचारणा करीत न्यायालयाने स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

Oct 6, 2012, 10:48 AM IST