एअर इंडियाची वरिष्ठ नागरिकांना विशेष सूट
विमान कंपनी एअर इंडिया प्रवाशांसाठी नेहमी नवीन योजना घेऊन येते. आताही एअर इंडियाने प्रवाशांसाठी नवीन योजना घोषीत केली आहे. त्यानुसार एअर इंडियाने वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा कमी केली आहे. याआधी वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६३ वर्षांची होती. आता ती ६० वर्षांपर्यत केली आहे. त्यामुळे आता ६० वर्षांच्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Apr 22, 2017, 10:40 AM IST'लेटलतीफ' प्रवाशांसाठी एअर इंडियाचा नवा नियम
आपल्या बेशिस्त वर्तनामुळे एअर इंडियाचं विमान लेट करणाऱ्या प्रवाशांना यापुढे जबर दंड भरावा लागणार आहे. विमान 1 तास लेट केल्यास 5 लाख, 1 ते 2 तास उशीर केल्यास 10 लाख आणि दोन तासांपेक्षा जास्त उशीर केल्यास तब्बल 15 लाख दंड भरावा लागणार आहे.
Apr 17, 2017, 06:27 PM ISTएअर इंडियाच्या प्रवाशांना मिळणार विशेष सूट
विमान कंपनी एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. एअर इंडियाने अमेरिकेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कंपनी विशेष सूट देणार आहे. स्टार अॅवार्ड माइलेज रिडंप्शन' नावाने ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.
Apr 16, 2017, 10:34 AM ISTआणखी एका खासदाराचा एअर इंडियाच्या विमानात गोंधळ
एअर इंडिया आणि शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्यातील वाद काही तांसापूर्वीच संपला असला तरी आता आणखी एका खासदाराचा वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार डोला सेन यांनी दिल्लीहून कोलकाताला जाणारं एअर इंडियाचं विमान अर्धातास रोखून धरलं. खासदारांनी सुरक्षेच्या प्रोटोकॉलचं पालन करण्यासही नकार दिला. खासदार डोला सेन यांनी विमानात गोंधळ देखील घातल्याचं बोललं जातंय.
Apr 7, 2017, 07:54 PM ISTअखेर, 'एअर इंडिया'नं गायकवाडांवरील बंदी उठवली!
विमान कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली बंदी अखेर 'एअर इंडिया'नं मागे घेतलीय.
Apr 7, 2017, 03:37 PM ISTरवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी मागे न घेतल्यास एनडीए बैठकीवर सेनेचा बहिष्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 07:22 PM ISTगायकवाड यांच्यावरील बंदी उठवली नाही तर एनडीए बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड बंदीप्रकरणी तोडगा दृष्टीपथात आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर लगेच बंदी उठण्याची शक्यता आहे. मात्र, तोडगा निघाला नाही, तर NDA बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
Apr 6, 2017, 06:37 PM ISTसंसदेची माफी मागतो, अधिकाऱ्याची नाही - गायकवाड
एअर इंडिया अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी लोकसभेत खासदार रविंद्र गायकवाडांनी निवेदन सादर केलं. माझ्यावर अन्याय झाला आहे असं सांगत जनतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधीसोबत गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
Apr 6, 2017, 12:56 PM ISTखासदार रवींद्र गायकवाड पुन्हा दिल्लीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 03:27 PM ISTशिवसेना विमान कंपन्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता
Mar 27, 2017, 11:41 PM ISTकपिलच्या अडचणीत आणखी भर
विमानातील गैरवर्तणुकीप्रकरणी एअर इंडियाने शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातलेली असतानाच आता कॉमेडियन कपिल शर्मावरही बंदी घालण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2017, 04:20 PM ISTलोकसभेत गायकवाड मारहाण प्रकरणाचा तिढा कायम
खासदार रवींद्र गायकवाडांवर विमान प्रवासाची घातलेल्या बंदी विरोधात हक्काभंगाच्या प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळलीय.
Mar 27, 2017, 02:10 PM ISTशिवसैनिकांनी 'एअर इंडिया'च्या अधिकाऱ्याचा पुतळा जाळला
उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणारे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत.
Mar 27, 2017, 01:50 PM ISTगायकवाडांवर अन्याय... लोहार, उमरगा बंद!
शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्या एअर इंडिया मारहाण प्रकरणात त्यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगत सेनेनं उस्मानाबादमधील लोहारा, उमरगा तालुक्यात कडकडीत बंदचं आवाहन केलंय.
Mar 27, 2017, 09:58 AM ISTम्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!
बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
Mar 26, 2017, 10:04 PM IST