कोपर्डी प्रकरण

कोपर्डी प्रकरणी मुख्य साक्षीदार असलेल्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष

 कोपर्डी प्रकरणी बुधवारी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात मुख्य साक्षीदार असलेल्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष नोंदवण्यात आली. पिडीत मुलीचा मावस भाऊ हा प्रत्यक्षदर्शी असून त्याची साक्ष नोंदवण्यात आली.

Dec 22, 2016, 08:06 AM IST

कोपर्डी प्रकरणी न्यायालयात आजपासून सुनावणी

कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे.

Dec 21, 2016, 03:10 PM IST

कोपर्डी प्रकरण : सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा

कोपर्डी प्रकरणी दोन दिवसात आरोपपत्र दाखल केलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करू असं सांगितलं होतं आता तीन महिने होत आले तरीसुद्धा आरोपपत्र दाखल झालेलं नाही. त्याविषयी सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय कोपर्डीच्या पीडितांना न्याय मिळवून देऊ असंही सुळे यांनी म्हटलं आहे. 

Oct 5, 2016, 01:16 PM IST

कोपर्डीच्या प्रकरणाचे ठिकठिकाणी पडसाद, अण्णा हजारेंनी केला निषेध

कोपर्डीच्या प्रकरणाचे ठिकठिकाणी पडसाद उमटले. लातूरमध्ये सर्वपक्षीय संघटनांनी दिलेल्या बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र बंदला हिंसक वळणही लागलं. लातूर तालुक्यातल्या भोई समुद्रगा इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस पेटवून दिली. ज्यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केलीय. 

Jul 19, 2016, 08:35 PM IST

कोपर्डी प्रकरणावरुन विधानसभेत गोंधळ

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्काराप्रकरणी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झालाय. 

Jul 18, 2016, 12:06 PM IST